राकाँ शेतकऱ्यांच्या पाठीशी
By Admin | Updated: May 15, 2015 00:32 IST2015-05-15T00:32:07+5:302015-05-15T00:32:07+5:30
भूसंपादन कायदा रद्द करण्यात यावा, धानाला योग्य भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी...

राकाँ शेतकऱ्यांच्या पाठीशी
साकोली : भूसंपादन कायदा रद्द करण्यात यावा, धानाला योग्य भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासह शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यासह अन्य मागण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात येत्या २२ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले.
एन.बी. पटेल महाविद्यालय साकोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संभाव्य उमेदवारी आणि नोंदणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर सदाशिव वलथरे, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, सुरेश कापगते, अंगराज समरीत, सुरेश बघेल, डॉ. अनिल शेंडे, जया भुरे, उमेद गोडसे, लता दुरूगकर, प्रेमलाल राऊत, रामचंद्र कोहळे आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकीतील उमेदवार आणि २२ ला आयोजित भव्य शेतकरी मोर्च्यासंबंधी चर्चा करण्यात आली. संचालन तालुका अध्यक्ष अंगराज समरीत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल शेंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)