घरकुल न बांधता निधीची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:30+5:302021-09-08T04:42:30+5:30
मेश्राम यांचा आरोप मानेगाव सडक येथील प्रकरण लाखनी : तालुक्यातील मानेगाव (सडक) येथील ग्रामपंचायतीद्वारे घरकुल निधी वितरणात गैरव्यवहार केल्याचा ...

घरकुल न बांधता निधीची उचल
मेश्राम यांचा आरोप
मानेगाव सडक येथील प्रकरण
लाखनी : तालुक्यातील मानेगाव (सडक) येथील ग्रामपंचायतीद्वारे घरकुल निधी वितरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. सुखदेव मेश्राम यांची खंडविकास अधिकाऱ्याकडे तक्रार करून माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दिनेश कांबळे यांनी सन २०१९-२० मध्ये घरकुल मंजूर करून घरकाम न करताच पैशाची उचल करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
मेश्राम यांनी ग्रामपंचायतची बांधकाम केलेल्या मजुरांच्या नावाची यादी, घरकुलासाठी वापरण्यात येणारे जागेचे विवरण, ग्रामपंचायतीचे मंजुरी पत्र व बांधकामाची मागणी होती. ग्रामसेवक भेंडारकर यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. नियोजित जागेवर बांधकाम झालेले नसल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत पातळीवरून होताना दिसत असल्याचे तक्रारीत स्पष्ट केले आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा निधी उचलला असून जुन्या बांधकामावर व आबादी जमिनीवर घरकुल उभारले असून ते २०१२ मधील असल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले आहे.
कांबळे हे मानेगाव (सडक) चे रहिवासी असून लाभार्थ्यांच्या नावे ग्रामपंचायतला गाव नमुना आठ उपलब्ध आहे. लाभार्थ्याला सन २०१९-२० च्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. त्याने स्वतःच्या जागेत घरकुल अर्ध्यापर्यंत पूर्ण केले आहे . त्या लाभार्थ्याला दोन हजाराचे ६५ हजार रुपये दिलेले आहे .काम नियमानुसार करण्यात आले आहे.
- नरेंद्र भांडारकर, सरपंच, मानेगाव(सडक)