शंकरपटावरील बंदी उठवा
By Admin | Updated: January 29, 2017 00:57 IST2017-01-29T00:57:06+5:302017-01-29T00:57:06+5:30
केवळ मनोरंजन म्हणून शंकरपटाचे आयोजन केले जाते तरीही शंकरपटावर न्यायालयाने बंदी घातली.

शंकरपटावरील बंदी उठवा
याचिकाकर्त्यांची मागणी : सर्वाेच्च न्यायालयाने अंतरीम निकाल द्यावा
साकोली : केवळ मनोरंजन म्हणून शंकरपटाचे आयोजन केले जाते तरीही शंकरपटावर न्यायालयाने बंदी घातली. यासंदर्भात जगत रहांगडाले व प्रभाकर सपाटे यांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. यासंदर्भात न्यायालयात युक्तीवाद झाला. मात्र अंतरीम निर्णय झाला नाही तरी शासनाने व न्यायालयाने शेतकऱ्याचे हितार्थ विचार करून शंकरपटाला सुरवात करावी, अशी मागणी याचीकाकर्ता प्रभाकर सपाटे व जगत रहांगडाले यांनी केली आहे.
तामिळनाडुमध्ये जलीकट्टूला परवानगी मिळाली त्याचप्रकारे शंकरपटालाही परवानगी मिळू शकते यासाठी पटप्रेमींनी व शेतकऱ्यांनी समोर येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात पुरातन काळापासून शेतकरी शेतीचे कामे आटोपली की मनोरंजन म्हणून शंकरपटाचे आयोजन करण्यात येते. शंकरपट संपल्यानंतर याच बैलजोडीने शेतकरी पुन्हा शेतीचे कामे करतो. या तीन ते चार महिन्याच्या कालावधीत शंकरपटामुळे मुला-मुलीचे विवाह जोडणे, बेरोजगारांना रोजगार मिळतो, महाराष्ट्राची कलाकृती, नाटक, लावण्यांचे आयोजन होऊन लोकांचा संपर्क वाढतो. गावागावात एकोपा वाढतो तरीही न्यायालयाने यावर बंदी आदेश दिले. शासनाने व न्यायालयाने शेतकरी व पटप्रेमीच्या भावना लक्षात घेता शंकरपटाला मान्यता द्यावी, अशी मागणी याचिकाकर्ता प्रभाकर सपाटे, जगत रहांगडाले यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)