पवनीत उपाध्यक्षपदी रायपूरकर यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:16 IST2017-01-17T00:16:38+5:302017-01-17T00:16:38+5:30
नगर परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवकांचे प्रथम सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली.

पवनीत उपाध्यक्षपदी रायपूरकर यांची वर्णी
न.प.निवडणूक : स्वीकृत सदस्यपदी विलास काटेखाये, बिसने यांची निवड
पवनी : नगर परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवकांचे प्रथम सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी काँग्रेसचे कमलाकर रायपूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, काँग्रेसचे राकेश बिसने, मनोहर उरकुडकर, अवनती राऊत व मच्छिंद्र हटवार यांचेपैकी नियमातील तरतुदीनुसार नगरविकास आघाडीच्या गटनेत्याने विलास काटेखाये व काँग्रेसच्या गटनेत्याने राकेश बिसने यांचे नाव सुचविल्याने त्यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांनी काम पाहिले.
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे कमलाकर रायपूरकर व राष्ट्रवादीच्या शोभना गौरशेट्टीवार यांनी अर्ज दाखल केले होते. शोभना गौरशेट्टीवार यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे कमलाकर रायपूरकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यांच्या निवडीवरुन शहर काँग्रेसमधील एक गट नाराज झाला होता. त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला नाही. (तालुका प्रतिनिधी)