चिरामनटोला येथे वर्षावास उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:01+5:302021-08-26T04:38:01+5:30

अध्यक्षस्थानी ग्राम शाखेचे अध्यक्ष देवानंद हुमने होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष एन.एल. मेश्राम, महासचिव कोमलकुमार नंदागवळी, ...

Rainy season at Chiramantola | चिरामनटोला येथे वर्षावास उत्साहात

चिरामनटोला येथे वर्षावास उत्साहात

अध्यक्षस्थानी ग्राम शाखेचे अध्यक्ष देवानंद हुमने होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष एन.एल. मेश्राम, महासचिव कोमलकुमार नंदागवळी, उपाध्यक्ष मनोहर भावे, सर्कल कामठा उपाध्यक्ष नरेंद्र गजभिये, महिला उपाध्यक्ष अस्मिता उके, कार्यालयीन सचिव विजय मेश्राम, हिशोब तपासनीस मयाराम गजभिये, महिला सचिव नूतन हुमने, संतोष उके, प्रतिमा चौरे, बादल हुमने, सतेंद्र हुमने, दर्पण भावे, टोलीराम हुमने, भाऊलाल हुमने, देवेंद्र रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी पाहुण्यांनी बौद्धांचे पवित्र स्थळे बुद्ध गया, कुशीनगर, सारनाथ, लुंबिनी आदींवर मार्गदर्शन केले. संचालन मेश्राम यांनी केले, तर आभार हुमने यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.

Web Title: Rainy season at Chiramantola