पावसाची हजेरी :
By Admin | Updated: September 2, 2015 00:33 IST2015-09-02T00:33:24+5:302015-09-02T00:33:24+5:30
भंडारा जिल्ह्यात वरूणराजाने कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे

पावसाची हजेरी :
भंडारा जिल्ह्यात वरूणराजाने कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. सोमवारी तुमसर येथे तर मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लाखनी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात तुमसर येथील सखल भागात पाणी साचल्याने रहदारीला अडथडा निर्माण झाला. लाखनी येथे आठवडी बाजार असल्याने मुसळधार पावसाचा भाजीपाला विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला. जनजीवनही विस्कळीत झाले होते.