चार महिन्यांमध्ये बरसला फक्त ७० टक्के पाऊस
By Admin | Updated: September 27, 2014 23:09 IST2014-09-27T23:09:40+5:302014-09-27T23:09:40+5:30
पावसाच्या मानाने बरा समजला जाणारा भंडारा जिल्हा यावर्षी मात्र तहाणलेला तर राहणार नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मान्सूनमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे.

चार महिन्यांमध्ये बरसला फक्त ७० टक्के पाऊस
भूजल साठ्याची पातळी बरी : मागील वर्षीपेक्षा घट
इंद्रपाल कटकवार - भंडारा
पावसाच्या मानाने बरा समजला जाणारा भंडारा जिल्हा यावर्षी मात्र तहाणलेला तर राहणार नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मान्सूनमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. गतवर्षी १४० टक्के पाऊस बरसला होता तर यावर्षी याची टक्केवारी ७१ टक्के इतकी आहे.
जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी. पाऊस बसला पाहिजे. दि.२७ सप्टेंबर २०१४ पर्यंत सरासरी ८८८.६ मि.मी. पाऊस बरसला आहे. मागीलवर्षीच्या याच दिवसाची सरासरी १६५९.५ मि.मी. इतकी होती. म्हणजेच यावर्षी निम्म्याने घट झाली आहे.
यावर्षी बरसलेल्या तालुकानिहाय पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा ९३०.१ मि.मी., मोहाडी ७९४.३, तुमसर ९३८.४, पवनी ८१४.८, साकोली १०३२.४, लाखांदूर ७८१.९ तर लाखनीत ९२८.३ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. या सर्वांची बेरीज ६२२०.२ मि.मी. असून याची सरासरी ८८८.६ मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरीच्या मानाने पावसाची टक्केवारी ७१ टक्के इतकी आहे.
सन २०१३ च्या मान्सून सत्रात तालुकानिहाय बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा १६०३ मि.मी., मोहाडी १३५५, तुमसर १४१६.२, पवनी १६६०.७, साकोली १८३१.१, लाखांदूर १९०४.८ तर लाखनीत १८४५.४ मि.मी. पाऊस बरसला होता. या सर्वांची बेरीज ११६१६.२ मि.मी. इतकी असून त्याची सरासरी १६५९.५ इतकी होती. त्याची टक्केवारी १४० इतकी होती. दरवर्षी १ जून ते ३१ आॅक्टोंबरपर्यंत बरसणाऱ्या पावसाची आकडेवारी व सरासरी पावसाची नोंद करण्यात येते. यावर्षीच्या दि.३१ आॅक्टोबरपर्यंत पावसाची सरासरी शंभरी गाठणार काय, असा प्रश्न आहे.