वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

By Admin | Updated: April 27, 2015 00:19 IST2015-04-27T00:19:19+5:302015-04-27T00:19:19+5:30

वैशाख वणव्यात उन्हाची प्रखरता वाढली आहे.

Rainfall in the district with stormy winds | वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

भंडारा : वैशाख वणव्यात उन्हाची प्रखरता वाढली आहे. असे असतांना मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक निसर्गाने रुख पालटून वादळी वाऱ्याला सुरुवात केली. यानंतर जिल्हाभरात पावसाची हजेरी लागली. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली.
एप्रिल हा महिना प्रचंड उकाळयाचा असतो. दिवसभर प्रखर उष्णता जाणवत असल्याने सर्वत्र कुलर व थंड हवेची उपकरणे सुरु करण्यात आली आहे. मात्र आज सकाळपासून प्रचंड असह्य उकाळा असतानाच चार वाजताच्या सुमारास वातावरणात बदल झाला. प्रचंड वादळासह पावसाने हजेरी लावली. जिल्हयातील पालांदूर येथे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे बचावासाठी अनेकांनी मिळेल तिथे आसारा घेतला. सुमारे तासभर पावसाने हजेरी लावल्याने वादळात सापडून अनेक घरांची टिनपत्रे तथा कैवारी छते उडाली. यासह उभ्या केलेल्या वाहनांनाही याचा फटका बसला. मार्गावरील अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडल्याचे चित्र बघायला मिळाले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rainfall in the district with stormy winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.