मऱ्हेगाव येथे अतिवृष्टीने घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:45 IST2019-08-04T22:45:21+5:302019-08-04T22:45:33+5:30
दोन दिवसांच्या अतिवृष्टीने राहते घर जमिनदोस्त झाले. संपूर्ण परिवार उघड्यावर आले. निवारा शोधावा कुठे हा प्रश्न ऐरणीवर आला. ही घटना लाखनी तालुक्यातील मºहेगाव (जुना) येथील असून भरत सोमाजी रहेले असे आपत्तीग्रस्त नागरिकाचे नाव आहे.

मऱ्हेगाव येथे अतिवृष्टीने घर कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : दोन दिवसांच्या अतिवृष्टीने राहते घर जमिनदोस्त झाले. संपूर्ण परिवार उघड्यावर आले. निवारा शोधावा कुठे हा प्रश्न ऐरणीवर आला. ही घटना लाखनी तालुक्यातील मºहेगाव (जुना) येथील असून भरत सोमाजी रहेले असे आपत्तीग्रस्त नागरिकाचे नाव आहे.
लाखनी तालुक्यात गत आठवड्यात दमदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहे. अशातच गरीबाच्या मोडक्या तोडक्या घरांची अक्षरश: पडझड झाली. अशीच घटना मºहेगाव (जुना) येथे घडली. शेजारी राहणारे कुटुंबीय रहेले यांच्या संकटात मदतीला धावले. अचानक आलेल्या आपत्तीने रहेले यांचा संसार उघड्यावर आला आहे. तात्पुरती अत्यावश्यक मदत देण्यात आली. मात्र प्रशासकीय चमू शनिवारी व रविवारीही आली नाही.
घरकुलाची अपेक्षा
रहेले दाम्पत्य नैसर्गिक संकटाने बेघर झाले. त्यांच्या नावाची ग्रामपंचायतीच्या यादीत घरकुल यादीत ‘ड’ मध्ये नाव नोंद आहे. या यादीला न्याय मिळणे सध्यातरी कठीण आहे. २०११ च्या चुकीच्या सर्वेनुसार गरजु लाभार्थ्यांचे नावच समाविष्ट नव्हते. याची तक्रार माजी सरपंच रामाजी बेंदवार यांनी जिल्हाधिकारी व बीडीओ यांना केली होती.
मात्र प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने गरीबाची वाट लागली. त्याचा प्रत्यय मºहेगावात आले. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीला अश्या समस्याला सामारे जावे लागत आहे. महसूल प्रशासनाने रहेले परिवाराला न्याय द्यावा, अशी मागणी सरपंच देवकन बेंदवार यांनी केले.