शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

सात वर्षांपासून वार्षिक सरासरीपेक्षा पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 5:00 AM

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी मुबलक पावसाची गरज असते. अपुरा पाऊस पडला की त्याचा थेट परिणाम धान उत्पादनावर हाेताे. गत सात वर्षांतील पावसाची आकडेवारी बघितल्यास पावसाने वार्षिक सरासरही गाठल्याचे दिसून येत नाही. २०१४ साली जिल्ह्यात ८८८.६० मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती. वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस हाेता. २०१५ मध्ये १०७०.१७ मि.मी. पाऊस काेसळला. हा पाऊस ८४ टक्के हाेता. 

ठळक मुद्देवार्षिक सरासरी १३३०.२ मि.मी. : कमी पावसाचा धान उत्पादनाला फटका, यंदाही अद्याप अपेक्षित पाऊस नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हमखास पावसाचा प्रदेश म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख असली तरी, गत सात वर्षांत पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मि.मी. असताना २०१४ ते २०२० या सात वर्षांत सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला. या कमी पावसाचा फटका धान उत्पादनाला बसत आहे. यंदाही पावसाने दडी मारली असून, अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राेवणी खाेळंबलेली आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी मुबलक पावसाची गरज असते. अपुरा पाऊस पडला की त्याचा थेट परिणाम धान उत्पादनावर हाेताे. गत सात वर्षांतील पावसाची आकडेवारी बघितल्यास पावसाने वार्षिक सरासरही गाठल्याचे दिसून येत नाही. २०१४ साली जिल्ह्यात ८८८.६० मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती. वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस हाेता. २०१५ मध्ये १०७०.१७ मि.मी. पाऊस काेसळला. हा पाऊस ८४ टक्के हाेता. २०१६ मध्ये ९११.०९ मि.मी. म्हणजे ७१ टक्के पाऊस काेसळला. २०१७ मध्ये ८८४.०१ मि.मी. अर्थात ६७ टक्के, २०१८ मध्ये १००७.८ मि.मी. म्हणजे ७६ टक्के, २०१९ मध्ये १२९७.३ मि.मी. म्हणजे ९८ टक्के आणि गतवर्षी ११८७.३ मि.मी. म्हणजे ८९ टक्के पाऊस काेसळला. २०१९ मध्ये सरासरीच्या जवळ पाऊस पाेहाेचला; परंतु सहा वर्षांत पाऊस ७५ टक्क्यांच्या आसपास काेसळला. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात तलाव असून, या तलावाची संचयक्षमता माेठी आहे; परंतु अलीकडल्या काळात तलावांमध्ये पुरेसे पाणी संचित हाेत नाही. तलावातील गाळ हे मुख्य कारण असले तरी पाणलाेट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी हाेत असल्याचा हा परिणाम आहे. वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी हाेणे हे आगामी काळासाठी धाेक्याची घंटा आहे.

सन २०१३ मध्ये १३२ टक्के पावसाची नाेंद सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र धाे-धाे पाऊस बरसला हाेता. १६८४.३४ मि.मी. म्हणजे १३२ टक्के पाऊस काेसळला हाेता. वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस त्या वर्षी काेसळला. त्यानंतर आजपर्यंत एकदाही पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. मध्यप्रदेशातील पावसाने येताे महापूरभंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण हाेण्याला मध्यप्रदेशात पडणारा पाऊस आणि मध्यप्रकल्पातील अतिरिक्त पाणी कारणीभूत आहे. गतवर्षी भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुराने हाहाकार उडविला हाेता. शेकडाे हेक्टरवरील पीक नष्ट झाले हाेते. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात ८९ टक्के पाऊस झाला हाेता. मात्र महापूर आला. मध्यप्रदेशातील संजय सराेवरातील पाणी साेडल्याने ही स्थिती निर्माण झाली हाेती.

 

टॅग्स :Rainपाऊस