रात्री पाऊस; दिवसा उन्ह

By Admin | Updated: June 16, 2015 00:37 IST2015-06-16T00:37:51+5:302015-06-16T00:37:51+5:30

जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या पावसाला विलंब झाला असला तरी रविवारी रात्री १.३० च्या सुमारास पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली.

Rain at night; Day they | रात्री पाऊस; दिवसा उन्ह

रात्री पाऊस; दिवसा उन्ह

भंडाऱ्यात ६४.८ मिमी पाऊस : उकाड्यापासून सुटका
भंडारा : जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या पावसाला विलंब झाला असला तरी रविवारी रात्री १.३० च्या सुमारास पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरात ६४.८ मिमी पावसाची तर जिल्ह्यात सरासरी ३३ नोंद करण्यात आली आहे.
सकाळी ८ वाजतापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. दहा वाजतानंतर उन्ह पडू लागले. दुपारी तापमान चांगलेच वाढले होते. गरमीमुळे असह्य झालेले नागरीक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अखेर रविवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. मागील आठवडाभरापासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीचे सहा दिवस कोरडे गेले. चार दिवसांपूर्वी काही तालुक्यात पाऊस झाल्यामुळे वातावरणात पुन्हा उकाडा वाढला होता. रविवारला दुपारीही चांगलेच उन्ह तापले होते. मात्र रात्री १.३० वाजताच्या सुमारास धो-धो पावसाला सुरुवात झाली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Rain at night; Day they

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.