शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅकवरील पूल बांधकामाला रेल्वेची हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:30 IST

तुमसर रोड येथील रेल्वे ट्रॅकवरील मुख्य उड्डाणपुल बांधकामाला हिरवी झेंडी मिळालेली असून या बांधकामाची निविदाही मंजूर झाली आहे.

ठळक मुद्दे१३ कोटींचा निधी : रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून पाहणी, ६० मीटरचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर रोड येथील रेल्वे ट्रॅकवरील मुख्य उड्डाणपुल बांधकामाला हिरवी झेंडी मिळालेली असून या बांधकामाची निविदाही मंजूर झाली आहे. यासाठी रेल्वे परिसरातील जमिनीचा मोबदला संबंधित कंत्राटदाराने रेल्वेला दिला आहे. रेल्वे प्रशासनाच्या अभियंत्यांनी कंत्राटदारासोबत अलिकडेच पाहणी केली असून मुख्य सिमेंट रेल्वे पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.तुमसर रोड येथे रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर राज्य शासन तथा रेल्वे यांचा संयुक्त उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली होती. राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी कार्यारंभ केला आहे. तुमसर - गोंदिया अ‍ॅप्रोच रस्त्यासह दोन अंडरपास राज्य शासनाने तयार करावयाचे आहेत. एका अंडरपासचे काम पूर्ण झाले असून अ‍ॅप्रोच रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहे. राज्य शासन येथे ३२ कोटी रुपये खर्च करीत आहे.रेल्वेने मुख्य सिमेंट पुलाचे (ट्रॅकवरील) काम करावयाचे आहे. १३ कोटींचे हे काम आहे. ६० मिटर लांब असा हा रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे काम आहे. रेल्वेने निविदा काढली होती. संबंधित कंत्राटदाराला रेल्वेने हिरवी झेंडी दिली. रेल्वेचे वरिष्ठ स्थापत्य अभियंते तथा कंत्राटदारांनी अलिकडेच पाहणी करून या कामांना सुरुवात केली आहे. जमिनीचा मोबदला कंत्राटदाराने येथे दिला.६० मीटरचा स्पॅन येथे आहे. दोन्ही बाजूला नेहमी पाणी साचून राहत असल्याने रेल्वेची जमिनीची कसून तपासणी केली. पाणी निचरा कुठून होईल, याची सविस्तर माहिती स्थापत्य अभियंत्यांनी घेतली आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग येथे मोकळा झाला आहे.सध्या राज्य शासनाच्या अखत्यारीतील अ‍ॅप्रोच रस्ता भरावयाची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरु करण्यात आलेला आहे. बाजुच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहतुकीची वर्दळ असल्याने कामे करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. परंतु खड्डे बुजविण्याची येथे गरज आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरून जाणाºया वाहनांचे अपघात घडलेले आहेत.जागतिक बँकेकडून या प्रकल्पाला निधी प्राप्त झाला असून बांधकाम खाते याठिकाणी पुलाच्या बांधकामावर नियंत्रण ठेवत आहेत. तुमसर-गोंदिया-रामटेक या मार्गावर उड्डाणपुल बांधकामाची मागील २५ वर्षापासूनची जुनी मागणी होती. उड्डाणपुल बांधकामाला पुन्हा येथे एक ते सव्वा वर्षे ईतका कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामे लवकरात लवकर व्हावी, यासाठी रेल्वे परिसरात साहित्याची जुळवाजुळव सुरु झाली आहे.