राहुल गांधी यांचा अवमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 00:14 IST2016-08-29T00:14:43+5:302016-08-29T00:14:43+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा चेहरा विद्रुप करुन व्हॉटस्अॅपवर टाकून राहूल गांधी यांची अवमानणा करण्यात आली.

राहुल गांधी यांचा अवमान
व्हॉटस्अपवरील प्रकार : पोलिसात तक्रार
साकोली : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा चेहरा विद्रुप करुन व्हॉटस्अॅपवर टाकून राहूल गांधी यांची अवमानणा करण्यात आली. या प्रकरणी अपमान करणाऱ्या घनशाम आगाशे रा. साकोली यांचेवर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार शहर व तालुका काँग्रेस कमेटीद्वारे पोलीस स्टेशन साकोली येथे करण्यात आली आहे.
साकोली येथे साकोली के सितारे हा ग्रृप व्हॉटस्अपवर कार्यरत आहे. त्या ग्रृपवर रात्री १० वाजुन २१ मिनीटांनी घनशाम महादेव आगाशे रा. सिव्हील लाईन वार्ड , साकोली याने काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचा फोटो विद्रुप करुन फोटो व्हॉटस्अपवर अपलोड केली. हा व्यक्ती नेहमी राहूल गांधी यांच्याबाबद अपमानास्पद मजकूर व फोटो अपलोड करीत असतो. घनश्याम आगाशे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला आहे. तक्रार देतांनी तालुका अध्यक्ष नंदु समरीत, नशिने, डॉ. अजय तुमसरे, उमेश कठाणे, जि.प. सदस्य अशोक कापगते, कृष्णा मेश्राम, प्रकाश करंजेकर, जे. डी. मेश्राम, ओमप्रकाश गायकवाड, सुरेश राऊत, दिलीप मासुरकर, आशिक गणवीर, दिपक रामटेके, विनायक देशमुख, सोविंदा तरजुले, गणेश बडोले, उमेश भांडारकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)