सिंलिडर्ससाठी रांगच रांग
By Admin | Updated: October 28, 2014 22:51 IST2014-10-28T22:51:44+5:302014-10-28T22:51:44+5:30
सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू आहे. या सणात गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र मागील काही दिवसापासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना विशेषता

सिंलिडर्ससाठी रांगच रांग
मोहाडी : सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू आहे. या सणात गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र मागील काही दिवसापासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना विशेषता महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील पाच सहा दिवसापासून तर सिलिंडरच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. खरोखरच गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे की गॅस एजेंसीधारकाने कृत्रिम टंचाई निर्माण केली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सिलिंडरसाठी नागरिक एजंसीच्या कार्यालयासमोर लांबच लांब रांगा लावत आहेत. तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने ऐन सणासुदीच्या दिवसावर विरजन पडत आहे.
दिवाळीचा सण हा १० ते १२ दिवसांचा असतो. या सणात प्रत्येक घरात खाद्य पदार्थ बनविले जातात. पाहुण्यांची रेलचेल असते. ग्रामीण भागात त्यावेळी मंडई, दंडारची धुम असते. याच पर्वात मुलामुलींच्या लग्नाची बोलणी केल्या जात असते. त्यामुळे पाहुण्यांची रेलचेल काही जास्त प्रमाणातच असते. अशावेळी सिलिंडरचा तुटवडा हा परिवारासाठी मनस्ताप निर्माण करणारा ठरत आहे. सिलिंडरचा नंबर लावल्यावर त्वरीत सिलिंडरची पुर्तता होईल, असे सांगण्यात येते. मात्र येथे याउलट स्थिती निर्माण झाली आहे. नंबर लावल्यानंतरही आठ ते १५ दिवसानंतर सिलिंडर देण्यात येते. गॅस एजंसीला त्यांच्या कोट्यानुसार सिलिंडरचा पुरवठा केला जातो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग हे सिलिंडर जातात तरी कुठे असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसातच नेहमी सिलिंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याने एजंसीच्या कार्यपद्धतीवर आणि संबंधित विभागाच्या भूमिकेवर शंका येत आहे. (शहर प्रतिनिधी)