असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:53 IST2019-01-21T22:53:29+5:302019-01-21T22:53:43+5:30
जिल्हा काँग्रेस असंघटीत कामगार कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पथविक्रेता समितीचे गठन करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा काँग्रेस असंघटीत कामगार कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पथविक्रेता समितीचे गठन करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
येथील विश्रामगृहापासून सोमवारी दुपारी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध मार्गाने जात मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. पथविक्रेता व फेरीवाला अधिनियमाची अंमलबजावणी करा, पथविक्रेता व फेरीवाºयांचे सर्वेक्षण करा, त्यांना ओळखपत्र व व्यवसाय परवाना देण्यात यावा, पथविक्रेता समितीची नियोजित बैठक कालावधी घेण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना देण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस असंघटीत कामगार कमिटीचे अध्यक्ष मार्कंड भेंडारकर यांनी केले. या मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधुकर लिचडे, प्रकाश भोंगे, अॅड.नंदा नंदनवार, उमेश भेंडारकर, हरगोविंद भेंडारकर, सरपंच कुंदन वाढई, करूणा वालदे, सरपंच हाटोळे, विमलताई हुकरे, दिलीप कुंभारे, लालचंद कटरे, रामू अंबादे, फत्थू धनंजय फेंडारकर, प्रकाश हिरणवार,
प्रभाकर धकाते, संजय डुंभरे, विवेक भोयर, रतिराम नखाते, एकनाथ नागरीकर, पुरूषोत्तम नागरीकर, मारोती खराबे यांच्यासह शेकडो नागरीक सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवेदन स्विकारून चर्चा करून लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन मोर्चेकरांना दिले.