आरोग्य केंद्र स्थानांतरणाचा प्रश्न आरोग्य मंत्र्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:40+5:30

सिहोरा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या शिवाय अन्य आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. आजारी रुग्णांना जलद गतीने आरोग्य सुविधा मिळत नसल्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु चुल्हाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवनिर्मिती इमारत असतांना या इमारतीत आरोग्य केंद्र स्थानांतरीत करण्यात आले नाही. यामुळे आजारी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नाही.

Question of transfer of health center in the chamber of health minister | आरोग्य केंद्र स्थानांतरणाचा प्रश्न आरोग्य मंत्र्यांच्या दालनात

आरोग्य केंद्र स्थानांतरणाचा प्रश्न आरोग्य मंत्र्यांच्या दालनात

Next
ठळक मुद्देचुल्हाड येथील प्रकार : समस्या सोडविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नविन प्रशस्त इमारतीत जलद गतीने स्थानांतरीत करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन माजी सभापती धनेंद्र तुरकर यांच्या नेतृत्वात राज्याचे आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले. यामुळे स्थानांतरणाचा प्रश्न लवकर सोडविले जाण्याची शक्यता आहे.
सिहोरा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या शिवाय अन्य आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. आजारी रुग्णांना जलद गतीने आरोग्य सुविधा मिळत नसल्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु चुल्हाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवनिर्मिती इमारत असतांना या इमारतीत आरोग्य केंद्र स्थानांतरीत करण्यात आले नाही. यामुळे आजारी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नाही.
नागरिक वाढत्या आजार व मृत्यूचे प्रमाण यामुळे भयभीत झाली आहे. आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक प्रयत्न करीत आहे. जिल्हास्तरावर आरोग्य सेवेचा आढावा घेतला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गावात अशा सुविधा व सेवा नाहीत. यामुळे त्यांना रेफर करावे लागत आहे. आधीच शहरात असणारे रुग्णालय फुल्ल झाले आहेत. यामुळे त्यांना उपचार मिळत नाही. परिणामी त्यांना गावात परत न्या, याशिवाय पर्याय राहत नाही. यामुळे या परिसरात असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.
यावेळी राष्ट्रावादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, सरपंच मधु अडमाचे उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
कोरोना संसर्ग व अन्य आजारात जलद गतीने वाढ होत असतांना आरोग्य सेवा अपुरी ठरत आहे. यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. चुल्हाडचा प्राथमिक आरोग्य केंद्र नविन इमारतीत तात्काळ स्थानांतरीत करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते राष्टÑपाल ऊके यांनी हस्ताक्षर अभियान सुरु केले आहे. विभिन्न आजाराने नागरिक ग्रस्त असताना आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्र सुरु करण्यात येत नाही. तांत्रिक अडचणी निकाली काढुन नविन इमारतीत आरोग्य सेवा सुरु करण्याचे निवेदनात नमुद आहे.
विरोधकांचा शासनाला अल्टीमेटम
आजारात रुग्ण संख्या वाढत असतांना चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नविन इमारतीत सुरु करण्यात आले नाही. ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न केले जात नाही. इमारत तयार आहे. यंत्रणा कार्यरत आहे. ही वेळ उद्घाटनाची नाही. सेवा देण्याची आहे. परंतु तसे प्रयत्न होत नाही. सामाजिक कार्यकर्ते किशोर रहांगडाले यांनी शासनाला महिनाभराचा अल्टीमेटम दिला आहे.

Web Title: Question of transfer of health center in the chamber of health minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.