स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:28 IST2016-03-01T00:28:47+5:302016-03-01T00:28:47+5:30
जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समिती अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया अद्यापपर्यंत झालेली नसून स्वातंत्र्य संग्राम...

स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न ऐरणीवर
प्रशासनाचे दुर्लक्ष : सैनिकाची हेळसांड
भंडारा : जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समिती अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया अद्यापपर्यंत झालेली नसून स्वातंत्र्य संग्राम सैनिक या विषयाला घेऊन प्रशासनालाया गौरव समिती अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करून सुद्धा अजूनही समितीचे अध्यक्ष निवडले गेलेले नाही. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना खासगी प्रश्न सोडविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीची निवड करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये तसेच पालकमंत्री यांच्या आदेशान्वये होत असते. त्यामुळे जिल्हा समिती गठीत होण्यासाठी विलंब होत असल्याचा निर्वाळा स्वातंत्र्य सैनिक यांना दिसून येत आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे जीवन वयोमानानुसार कठीण झाले असते. कुटुंबाचे अनेक प्रश्न व समस्या सोडविण्यास समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचे काम सोपे होत असते. समितीला अजूनपर्यंत अध्यक्षाची निवड झाली नसल्यामुळे कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची पायपीट होत आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी सभेचे आयोजन करून स्वातंत्र्य सैनिक गौरव समिती बोलावून समितीचे सदस्य निवडीचे काम पूर्ण करून सदस्यांच्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निवेदन गौरव समितीचे माजी अध्यक्ष शत्रूघ्न नागलवाडे यांनी दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)