गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव
By Admin | Updated: June 14, 2016 00:22 IST2016-06-14T00:22:59+5:302016-06-14T00:22:59+5:30
कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात क्रीडा विभाग व जयंत कटकवार स्पोर्टस् अॅकेडमीतर्फे मार्च २०१६ च्या माध्यमिक शालांत....

गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव
साकोली : कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात क्रीडा विभाग व जयंत कटकवार स्पोर्टस् अॅकेडमीतर्फे मार्च २०१६ च्या माध्यमिक शालांत परीक्षेत क्रीडागुण सवलत घेवून उत्तीर्ण झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
क्रीडा गुण सवलत घेऊन विद्यालयातील साक्षी राखडे व जितेंद्र खोटेले यांचा सत्कार करण्यात आला. भंडारा येथे आयोजित राजीव गांधी खेळ अभियानांतर्गत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धाचे आयोजन छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आले होते. यात नागपूर विभागीय चमूमध्ये साक्षी राखडे या विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता. अनुक्रमे शालांत परीक्षेत ८६.६० व ७३.२० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाले. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेवून त्यांना क्रीडागुण सवलत मिळाली. उत्तीर्ण खेळाडूंचे अभिनंदन विद्या कटकवार, विशाल कटकवार, क्रीडा समितीचे उपाध्यक्ष राजकुमार दुबे, सदस्य राजेश बैस, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, तालुका क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे, क्रीडा संघटक शाहीद कुरैशी, मार्गदर्शक भोजराम चौधरी, शिक्षक पालक यांनी कौतूक केले आहे. (तालुका प्रतिनिधी)