अजगराने केली शेळी गिळंकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:16 IST2016-06-04T00:16:47+5:302016-06-04T00:16:47+5:30
इंदिरानगर-राजेदहेगाव सीमेलगत असलेल्या नाल्याजवळ चरत असलेली १० किलोची शेळी अजगराने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला.

अजगराने केली शेळी गिळंकृत
इंदिरानगर-राजेदहेगाव सीमेवरील घटना : दोन दिवसानंतर सोडले जंगलात
प्रल्हाद हुमणे जवाहरनगर
इंदिरानगर-राजेदहेगाव सीमेलगत असलेल्या नाल्याजवळ चरत असलेली १० किलोची शेळी अजगराने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सर्पमित्राला पाचारण करण्यात आले असता, अर्धी शेळी अजगराने गिळली होती. अजगराला पकडून त्याला कोका जंगलात सोडण्यात आले.
इंदिरानगर येथील जनावरे चराईसाठी राजेदहेगाव-इंदिरानगर सीमेवर ३१ मे रोजी नेण्यात आली होती. दुपारनंतर दामोदर इटनकर यांच्या शेतशिवारालगत शेळी चरत असतांना अजगाराला आपले खाद्य मिळाले आहेत.
या आशेने १० किलो वजनाची शेळीला गिळकृंत केले. तिला गिळायला सुरुवात केली असता इतर जनावरे जोरजोराने हंबरायला लागली.
गाईराख्याने ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरविली. ठाणा येथील सर्पमित्र नदीम कलाम शेख याला पाचारण करण्यात आले. नदीमने आपल्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरुण शेळीला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अजगराला तोंडापासून दोन फुट पकडताच बकरीला खाली सोडले. मात्र तोपर्यंत शेळीचा मृत्यू झाला होता.
याची सुचना लगेच वनविभागाला देण्यात आली. दोनदिवस वाट पाहले असता वनविभागाचा एकही कर्मचारी अजगराला घेऊन जाण्यास आले नाही. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. याउलट नदीम शेख यांनाच अजगराला कोका जंगलात सोडायला सांगितले. लगेच त्या १२ फुट लांबीचा , २२ किलो वजनाचा रॉफटर जातीच्या अजगराला सर्पमित्र नदीम यांनी होमेंद्र भोयर, विशाल पिंपळशेंडे, पवन थोटे यांच्या सोबत चारचाकी वाहनाद्वारे आज ३ जून रोजी दुपारनंतर सुखरुप सोडून देण्यात आले.
आतापर्यंत सर्पमित्र नदीम शेख यांनी परिसरातील ३६०० च्या वर विषारी-बिन विषारी सापाला सुखरुप जीवनदान देत, शहापूर झीरी व कोका येथील वनविभागाच्या जंगलात सोडून देण्यात आले.