मागील हंगामात ७,८०,६१५ क्विंटल धान खरेदी

By Admin | Updated: November 3, 2015 02:07 IST2015-11-03T02:07:44+5:302015-11-03T02:07:44+5:30

भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक हे धानाचे आहे. जिल्ह्याच्या

Purchase of 7,80,615 quintals of rice in the previous season | मागील हंगामात ७,८०,६१५ क्विंटल धान खरेदी

मागील हंगामात ७,८०,६१५ क्विंटल धान खरेदी

भंडारा : भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक हे धानाचे आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत धान पिक हे महत्वपूर्ण आहे. सन २०१४-१५ च्या हंगामात आलेल्या अवकाळी पावसामुळे व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. त्याला दिलासा देण्यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदीदरा व्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल २५० रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ जिल्ह्यातील १९ हजार ५२५ शेतकऱ्यांना झाला असून त्यांना १९ कोटी ५१ लाख ५३ हजार ७५० रुपये प्रोत्साहनपर मदत म्हणून वाटप करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ७८ हजार आणि रबी हंगामात ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिक घेण्यात येते. सन २०१४-१५ च्या हंगामात आलेल्या अवकाळी व नैसर्गिक आपत्तीत सुद्धा धानाची विक्रमी खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात पणन महासंघाच्या ४० केंद्रातून सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर ३० जूनपर्यंत ७ लाख ८० हजार ६१५ क्विटंल धानाची विक्रमी खरेदी करण्यात आली.
तालुकानिहाय धान खरेदी अशी आहे, भंडारा २४,५२५ क्विंटल, मोहाडी ६०,८२२ क्विंटल, तुमसर १ लाख २३,१४० क्विंटल, लाखनी १ लाख ६९,२५३ क्विंटल, साकोली १ लाख २९,६५३ क्विंटल, लाखांदूर १ लाख ९५,७५४ क्विंटल, पवनी ७७,४६४ क्विंटल अशी एकुण ७ लाख ८० हजार ६१५ क्विंटल धान सर्वसाधारण शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली.
अ वर्गवारीतील धानाला १,४०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आणि सर्वसाधारण धानाला १,३६० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दर देण्यात आला. पणन महासंघाने ‘अ’ वर्गवारीतील धान मोहाडी व तुमसर येथून एकूण ८ हजार ६८२ क्विंटल खरेदी केला. या धानाची किंमत १ कोटी २१ लाख ५५ हजार ५०० रुपये इतकी आहे. पणन महासंघाने १९,५२५ शेतकऱ्यांकडून ७ लाख ८० हजार ६१५ क्विंटल धान खरेदीसाठी १०६ कोटी १९ लाख ८४ हजार २९८ रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Purchase of 7,80,615 quintals of rice in the previous season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.