‘त्या’ नरबळी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या
By Admin | Updated: November 20, 2014 22:47 IST2014-11-20T22:47:58+5:302014-11-20T22:47:58+5:30
वर्धा जिल्ह्यातील रुपेश मुळे नरबळी व क्रुर हत्यासंबंधी गुन्हेगार व्यक्तीस तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा भंडारा यांनी जिल्हाधिकारी भंडारा

‘त्या’ नरबळी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या
भंडारा : वर्धा जिल्ह्यातील रुपेश मुळे नरबळी व क्रुर हत्यासंबंधी गुन्हेगार व्यक्तीस तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा भंडारा यांनी जिल्हाधिकारी भंडारा मार्फत महाराष्ट्र शासनास केली आहे.
वसंतराव लाखे, मुलचंद कुकडे, मदन बांडेबुचे, अशोक गायधने, रामभाऊ येवले, शिल्पा बन्सोड यांनी निवासी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना दिलेल्या निवेदनानुसार, मागील दहा दिवसापासुन संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील म ृत रुपेश मुळे नरबळी प्रकरणाचा शोध लावण्यास पोलिसांना यश आलेले आहे. गुप्तधन मिळविण्याकरिता चिमुकल्या मुलाचा नरबळी देवुन श्रीमंत बनण्याचा अंधश्रद्धा विषयक अघोरी कृत्यातुन ही हत्या करण्यात आली आहे. या घृणास्पद लांछणास्पद, अत्यंत क्लेशदायक हत्याकांडाचे व नरबळी प्रकरणाचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तिव्र शब्दात निंदा करून जाहिर निषेध करते आहे. या नरबळी प्रकरणाचा आरोपी आसिफ शहा वल्द अजिम शहा उर्फ मुन्ना पठाण याला ताबडतोब शिक्षा सुनावुन जास्त दिरंगाई न करता फाशीची शिक्षा एक महिन्याच्या आत देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यसचिव, गृहराज्यमंत्री, गृह सचिव व पोलीस आयुक्त (विभागीय), नागपुर यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे. (नगर प्रतिनिधी)