पैसेवारीत तुमसर तालुक्याला मिळणार भोपळा !

By Admin | Updated: January 15, 2016 01:25 IST2016-01-15T01:25:03+5:302016-01-15T01:25:03+5:30

तालुक्यात खरीप हंगामात पावसाने दगा दिला. दुष्काळसदृष्य स्थिती असूनही तालुक्याची आणेवारी ६८ पैसे इतकी नोंदविण्यात आली.

Pumpala will get Tumsar taluka! | पैसेवारीत तुमसर तालुक्याला मिळणार भोपळा !

पैसेवारीत तुमसर तालुक्याला मिळणार भोपळा !

शेतकरी संकटात : १३१ गावांची पैसेवारी ६८ पैसे, १२ गावे ५० पैशापेक्षा कमी
तुमसर : तालुक्यात खरीप हंगामात पावसाने दगा दिला. दुष्काळसदृष्य स्थिती असूनही तालुक्याची आणेवारी ६८ पैसे इतकी नोंदविण्यात आली. १३१ गावांची आणेवारी ६८ पैैसे तर १२ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे तुमसर तालुक्याला शासनाकडून भोपळा मिळणार आहे.
पावसाळ्यात धानाचे पिक अत्यल्प पावसामुळे हातून गेले. तुमसर तालुक्यात दुष्काळसदृष्य स्थिती आहे.
महसूल विभागाने तुमसर तालुक्याची आणेवारी ६८ पैसे असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. तालुक्यात एकूण गावे १५० आहेत. त्यापैकी खरीप पिकांची गावे १४३ आहेत. १२ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. यात पवनारखारी, हमेशा, गोबरवाही, सुंदरटोला, येदरबुची, चिखला, राजापूर, सीतासावंगी, गुढरी, खंदाड, सौदेपूर व धामनेवाडा या गावांचा समावेश आहे.
पीक नसलेली ७ गावे
तुमसर तालुक्यात पिक नसलेली सात गावे आहेत. यात सुसुरडोह, कमकासुर, सितेकसा, लक्ष्मीपूर, हमेशा, पांगळी, हमेशा, निलागोंदी व मंडेकसा या गावांचा समावेश आहे. यातील काही गावे धरणक्षेत्रात बुडीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pumpala will get Tumsar taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.