डाळींब पिकातून केली बेरोजगारीवर मात
By Admin | Updated: August 1, 2016 00:15 IST2016-08-01T00:15:30+5:302016-08-01T00:15:30+5:30
भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. पण पारंपारिक पिकाकडे धान उत्पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात पडला.

डाळींब पिकातून केली बेरोजगारीवर मात
बंधाटे बंधूंच्या प्रयत्नाला यश : पाऊण एकरात अडीच लाख डाळिंबाचे उत्पादन
विलास बन्सोड उसर्रा
भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. पण पारंपारिक पिकाकडे धान उत्पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात पडला. त्यामुळे आता पारंपारिक पिकांना डावलून शेतकरी अन्य पिकाकडे वळले आहेत. तुमसर तालुक्यातील बपेरा (आंबागड) येथील दोन भाऊ यांनी मिळून डाळींब पिकाच्या माध्यमातून रोजगारावर मात केली आहे.
प्रदीप बंधाटे व अरविंद बंधाटे असे या शेतकऱ्यांचे नाव. तुमसर तालुक्यातील बपेरा (आंबागड) येथील सख्ख्या भावांनी आपण शेतात डाळींब पिके घेण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी त्यांनी सर्वप्रथम कृषी अधिकारी यांचा सल्ला घेतला. त्यावर अधिकाऱ्यांनी आपल्याकडील जमीनीला डाळींबासाठी वातावरण योग्य नाही असे सांगितले. पण बंधाटे बंधूनी अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही.
जिद्द व चिकाटीने दोन्ही बंधाटे बंधूनी डाळींब पिक लावण्याचा निर्धार केला व शेवटी जानेवारी २०१५ मध्ये फक्त पाउन एकर जागेत डाळींबाची लागवड केले. यात ३३० झाडे सदर शेतीत लावण्यात आले. सदर डाळींबाची जात भगवा असी आहे.
यासाठी शेतात ठिंबक सिंचन पध्दतीने पाणीपुरवठा सुरु केले. यासाठी त्यांना सदर पिक लागवडी व संगोपनासाठी आतापर्यंत ५० हजार रुपये खर्च आला. यात खत, निंदन यांचा समावेश आहे.
बारा महिण्यात डाळींबाचे फळ धरायला सुरुवात झाली. आता हे डाळींबाचे बाग अठरा महिण्यांचे झाले असून २.५० लाख एवढे किंमतीचे झाले असून डाळींब तोडणीस आले आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे केवळ डाळींब पिक घेऊन पिकासोबत आंतरपिक म्हणून सरकारी मुंगाची लागवड करण्याचे ठरविले. यासाठी डाळींबाच्या खाली जागेत किमान दोन महिण्यापूर्वी सरकारी मुंगाची लावगड केली. येत्या दिवाळीपर्यंत सरकारी मुंग तोडणीस येईल असा बंधाटे बंधूचा अंदाज आहे.
दोन्ही बंधू सुशिक्षीत व तरुण आहेत. पारंपारिक पिकाला डावलून दुसरा कोणतातरी पिक घ्यावा या बेताने त्यांनी पिके लावली व आता आणखी तीन एकरात डाळींब पिक लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांच्या प्रयतनाने नवतरुण बेरोजगारावर खरोखरच मात केली आहे.