सिहोरा येथे जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:37+5:30
४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील गावात एका सामाजिक कार्यकर्त्यांचा या आजाराने नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेने दर शनिवारला व्यापार नगरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

सिहोरा येथे जनता कर्फ्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात आणि गावात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आले असल्याने सिहोरा गावात दर शनिवारला व्यापारी संघटनेने जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन घोषित केल्याने नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.
४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील गावात एका सामाजिक कार्यकर्त्यांचा या आजाराने नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेने दर शनिवारला व्यापार नगरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अन्य दिवस व्यापार करतांना फिजीकल डिस्टन्सिंग व मास्क विना ग्राहकांना साहित्य विक्री करण्यात येऊ नये, अशा सुचना देत शनिवारपासून गावात जनता कर्फ्यू व लॉकडाऊन घोषित करण्यात आले. सकाळपासून संपुर्ण व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहे. गावातील नागरिकांनी बाहरे फिरण्याचे टाळले आहे.
गावात बँक, पतसंस्थाचे कार्यालय सुरु ठेवण्यात आले असता ग्राहक मात्र दिसून आले नाही. औषधी दुकाने व खाजगी वैद्यकीय सेवा जनता कर्फ्यूमधून वगळण्यात आले आहे. गावात असणारे मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने, बार, भोजनालय मालकांनी जनता कर्र्फ्यूमध्ये सहभाग घेतला आहे. यामुळे गावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी यंत्रणेने गावात भ्रमंती करीत व्यापारी व दुकानाची चौकशी केली आहे.