जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:26 IST2017-11-11T23:26:10+5:302017-11-11T23:26:29+5:30

जागतिक विधी दिवस निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत जिल्हा न्यायालय, भंडारापासून तर भंडारा येथील मुख्य मार्गाद्वारे गुरूवारला रॅली काढण्यात आली.

Public awareness rally organized by District Legal Services Authority | जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जनजागृती रॅली

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जनजागृती रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जागतिक विधी दिवस निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत जिल्हा न्यायालय, भंडारापासून तर भंडारा येथील मुख्य मार्गाद्वारे गुरूवारला रॅली काढण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत लोकांना देण्यात येणारे विधी सहायक व सल्ल्याची जनजागृती होण्याकरिता सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय आ. देशमुख, जिल्हा न्यायाधीश-१ आर.पी. पांडे, जिल्हा न्यायाधीश-२ एस.बी. भंसाली, एस.जे. भट्टाचार्य, प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस अधीक्षक विनिता साहू, वकील मंडळी, भंडारा जिल्हा न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.
ठिकठिकाणी सदर रॅलीमार्फत मार्गदर्शनपर भाषणे आर.पी. पांडे जिल्हा न्यायाधीश भंडारा, एस.जे. भट्टाचार्य, प्रभारी सचिव, विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व वकील मंडळींनी केलीत. रॅलीमध्ये सहभाग घेतल्याबाबत प्रभारी सचिव विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Public awareness rally organized by District Legal Services Authority