पोलिसांनी काढली शहरातून जनजागृती रॅली

By Admin | Updated: January 23, 2016 00:56 IST2016-01-23T00:56:10+5:302016-01-23T00:56:10+5:30

अपघाताला कारणीभूत नागरिक व अपघाताला बळी पडणारे नागरिक जवळपास स्थानिकच असतात.

Public awareness rally from the city | पोलिसांनी काढली शहरातून जनजागृती रॅली

पोलिसांनी काढली शहरातून जनजागृती रॅली

रस्ता सुरक्षा सप्ताह : साकोली पोलीस विभागाचा उपक्रम
साकोली : अपघाताला कारणीभूत नागरिक व अपघाताला बळी पडणारे नागरिक जवळपास स्थानिकच असतात. शहरातील अपघात कमी करायचे असतील तर शहरातील प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळावे याकरिता जनजागृतीसाठी साकोली पोलिसांतर्फे साकोली शहरात रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅलीत प्रामुख्याने साकोली येथील नवजीवन विद्यालय, नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली, कामाई करंजेकर विद्यालय, कृष्णमुरारी कटकवार, जि.प. हायस्कूल, लक्ष्मीनारायण हायस्कूल येथील शालेय विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांची ओपन जिप्सी, काळी पिवळी, बस, टोल वाहन, पोलीस गाडीतून रॅली काढण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार नाना पटोले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. सदर रॅली ही नंदलाल पाटील कापगते विद्यालय येथून निघून साकोली शहरातून मुख्य मार्गाने फिरत असताना ओपन जिप्सीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शहरातील नागरिकांनीसुद्धा उत्तम प्रतिसाद दर्शविला.
साकोली शहरातून फिरत परत नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे सदर रॅली समाप्त झाली.
शाळेच्या पटांगणावर रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार बाळा काशिवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनींनी स्वागत गीत सादर केले. रस्त्यावर चालताना नागरिकांच्या चुकीमुळे कसे अपघात घडतात, याबाबत नंदलाल कापगते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर जीवन सुरक्षा प्रकल्प या संघटनेकडून पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दृष्परिणाम व नियमांचे पालन केल्यास होणारे फायदे व अपघात झाल्यास पोलिसांसोबतच नागरिकांनी सुद्धा अपघातग्रस्त व्यक्तीस तात्काळ मदत करावी जेणे करून अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचतील याबाबत जनजागृती केली.
याअनुषंगाने सदर कार्यक्रमात वाहतूक नियमांबाबत माहितीपत्रकाचे बाळा काशीवार यांचे हस्ते विवेचन करण्यात येवून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी करता येईल व होणारी जिवीतहानी टाळता येईल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक फौजदार राजन गोंडगे, रवींद्र मडावी, पोलीस हवालदार ग्यानीराम गोबाडे, पुरूषोत्तम भुतांगे, देवीदास बागडे, पोलीस नायक स्वप्नील भजनकर, मिलिंद बोरकर, कमलेश पडोळे, महिला पोलीस उमेश्वरी नाहोकर, संगीता मारबते, राजश्री गोडंगे, वाहतूक पोलीस आशिष तिवाडे, देवेंद्र खडसे व नवनीत जांभुळकर, नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील शिक्षक कापगते व टूरिस्टचे गाईड लेहेंद्र गेडाम यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Public awareness rally from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.