कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती

By Admin | Updated: October 13, 2014 23:18 IST2014-10-13T23:18:25+5:302014-10-13T23:18:25+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत कुष्ठरोग विषयी आरोग्य शिक्षण व जनजागृती, विकृती प्रतिबंध व वैद्यकीय पुनर्वसन उपक्रम राबविण्यात आला.

Public awareness of leprosy eradication | कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती

जांब (लोहारा) : प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत कुष्ठरोग विषयी आरोग्य शिक्षण व जनजागृती, विकृती प्रतिबंध व वैद्यकीय पुनर्वसन उपक्रम राबविण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या सर्व गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन प्रभात फेरी काढून गावकऱ्यांना कुष्ठरोग हा सर्वसामान्य इतर रोगासारखा रोग असून जंतुमुळे होतो. या रोगाचा परिणाम प्रामुख्याने त्वचा व मज्जावर होतो. अल्प सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोग दोन प्रकारचा असतो. एम.डी.टीच्या नियमित उपचाराने कुष्ठरुग्ण पूर्णपणे बरा होतो.
याविषयी गावागावामध्ये जनजागृती केली तसेच जांब येथे शिबिर आयोजित करुन एमडीटी उपचार सर्व आरोग्य केंद्रात मोफत दररोज उपलब्ध आहे. तसेच शरीरावर चट्टा दिसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावे. तर कुष्ठरोग स्पर्श केल्याने, अन्नाद्वारे, पाण्याद्वारे होत नसून कुष्ठ रुग्णाने वापरलेली कांडी वापरल्याने, तो अनुवंशिक नाही व देवाचा शापही नसल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी व्ही. के. आगलावे यांनी आयोजित शिबिरामध्ये माहिती दिली.
तसेच कुष्ठरोगबाधित रुग्ण सर्व सामान्यासारखे जीवन जगु शकतील आदी कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो हा सकारात्मक उद्देश समाजामध्ये गावागावात पोहचविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धासुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्र जांब कडून आयोजित करण्यात आले. कृष्ठरोग निर्मूलन जनजागृती मोहीम राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी व्ही. के. आगलावे, तालुका वैद्यकिय अधिकारी जे. बी. बनोटे आरोग्य सहायक, अरविंद कानतोडे, आरोग्य साहाय्यिका कुलकर्णी, आरोग्य सेवक विजू उके, देशमुख, व्ही. डी. बारापात्रे, औषधी निर्मुल अधिकारी राकडे, आरोग्य सेविका नंदेश्वर, एम. बी. भवसागर, ढबाले, एम. बी. रंगारी, सुनीता लोहबरे, साकुरे, परिचर ज्ञानेश्वर कोटकने, लक्ष्मीकांत सोनवाणे, सी.डी. तुपट, डाटा आॅपरेटर विवेक भिवगडे यादींनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Public awareness of leprosy eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.