पवनारा येथे जनजागृती व कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:21+5:302021-06-24T04:24:21+5:30
कोविड लसीकरणाविषयी ग्रामीण भागात चुकीचा वारा वाहत असल्याने बऱ्याच नागरिकांनी लसीकरण केले नसल्याने नागरिकातील गैरसमज काढण्याकरिता विवेकानंद तंत्र निकेतनच्या ...

पवनारा येथे जनजागृती व कोविड लसीकरण
कोविड लसीकरणाविषयी ग्रामीण भागात चुकीचा वारा वाहत असल्याने बऱ्याच नागरिकांनी लसीकरण केले नसल्याने नागरिकातील गैरसमज काढण्याकरिता विवेकानंद तंत्र निकेतनच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. यात समितीचे अध्यक्ष कमलेश उचिबघले, सचिव शंभू सिंह, प्राचार्य नागेंद्र डहरवाल, डॉ. प्रशांत ढेभरे, आशिष दहीवले, दीपक कळू, जगत बिसेन, मुकेश पडोळे, विजय बोंद्रे, नवीन लाऊत्रे, आकाश डहरवाल, नितीन कावळे, बबलू मिश्रा, अजय झंझाड, संतोष झोडे, राहुल राठोड, सरपंच रशीद शेख, तलाठी एम. एस. डलबे, ग्रामसेविका पी. एस. खंडाते, भगवान नेवारे, सदस्य तेजराम रहांगडाले यांनी प्रत्येक घरी जाऊन कोविड लसीकरण करण्यासाठी आग्रह धरला. नागरिकात असलेला गैरसमज दूर केल्याने ७० नागरिकांनी लसीकरण केले. यावेळी डॉ. प्रीती उमरेडकर, आरोग्य सेविका बी. एच. डबळे, आरोग्य सेवक सुनील हुगे उपस्थित होते.