उद्योगशील तरूणांना तातडीने कर्ज द्या
By Admin | Updated: October 23, 2016 01:05 IST2016-10-23T01:05:57+5:302016-10-23T01:05:57+5:30
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तरूणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत

उद्योगशील तरूणांना तातडीने कर्ज द्या
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : प्रत्येक शाखेने किमान २५ जणांना कर्ज देणे अनिवार्य
भंडारा : प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तरूणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत बँकांनी त्यांच्याकडे मागणी करणाऱ्या प्रत्येक उद्योगशील तरूणाला मुद्रा योजनेत कर्ज देणे अनिवार्य असून प्रत्येक शाखेने किमान २५ जणांना कर्ज द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित बँकर्सची आढावा बैठकीत ते बोलत होते. अग्रणी बँक व्यवस्थापक विजय बागडे, नाबार्डचे अरविंद खापर्डे व बँक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुद्रा योजना, खरीप पिक कर्ज व रब्बी पिक कजार्चा या बैठकीत आढावा घेण्यात आला. जुनेच उद्योग करणाऱ्यांना कर्ज देण्यापेक्षा नवीन उद्योग सुरू करणाऱ्या युवकांना कर्ज देणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. मुद्रा योजनेत बँकांच्या शाखांनी कमीत कमी २५ प्रकरणे करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही केसेस करू शकता, असे ते म्हणाले. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी शिशु योजनेत जास्त केसेस केल्याचे निदर्शनास आले असता तरुण व किशोर योजनेत कर्ज देण्याचे निर्देश दिले.
मुद्रा योजनेत कर्ज घेऊन उद्योग सुरु करण्याची इच्छा असणा?्या युवकांना बँक मोघम उत्तर देऊन त्यांचा अर्ज रद्द करत असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. यावर नाराजी व्यक्त करून यापुढे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाखा व्यवस्थापकावर कारवाईची शिफारस करण्यात येईल, असे सांगितले.
केवळ उद्योगच नाही तर शेती पूरक व्यवसायाला सुध्दा या योजनेत कर्ज देण्यात यावे. आरसेटी व शासनाच्या विविध प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणा?्या युवकांना मुद्रा योजनेत प्राधान्याने कर्ज देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. नॉन परफॉर्मंस शाखांचा आढावा जिल्हा समन्वयकांनी शाखा निहाय घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुद्रा योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी बँकांनी जनजागृती मोहीम, मेळावे घेणे व प्रत्येक शाखेत मुद्रा योजनेचा फलक लावणे आदी बाबी प्राधान्याने कराव्यात. मुद्रा योजनेतील प्रलंबित प्रकारणांचा निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत खरीप पिक कजार्चा आढावा घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी खरीप कर्ज देण्याची टक्केवारी सर्वच बँकांची कमी असल्याचे नमूद करून रबी पिकासाठी जास्तीत जास्त पिक कर्ज देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिल्या. पिक कर्ज घेण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही ते म्हणाले. बँक शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करणार नसतील तर बँकमधील शासनाच्या ठेवी वापस घेण्यावर विचार करावा लागेल असा ईशारा त्यांनी बँकाना दिला. रबी हंगामात आपला परफॉर्मंस सुधारावा, असे निर्देश त्यांनी बँकाना दिले. (शहर प्रतिनिधी)