आधी सोयीसुविधा द्या मगच टोल वसुली करा
By Admin | Updated: September 18, 2015 00:40 IST2015-09-18T00:40:39+5:302015-09-18T00:40:39+5:30
मागील सहा वर्षापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. हे चौपदरीकरण करतानी महामार्गाच्या दोन्ही बाजुला नाल्या बांधण्यात आल्या.

आधी सोयीसुविधा द्या मगच टोल वसुली करा
कंपनीला निवेदन : मंदार खेडीकर यांची मागणी
साकोली : मागील सहा वर्षापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. हे चौपदरीकरण करतानी महामार्गाच्या दोन्ही बाजुला नाल्या बांधण्यात आल्या. मात्र या नाल्यात पाणी साचून राहत असून रस्त्यावरील हायमास्ट लाईट कधी सुरू तर कधी बंद असतात. त्यामुळे अशोका बिल्डकॉन कंपनीने आधी सोयी सुविधाची पुर्तता करावी मगच टोल वसूल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे साकोली शहर अध्यक्ष मंदार खेडीकर यांनी केली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या नाल्याची उंची ही गावातील नाल्यापेक्षा जास्त असल्याने नालीतील सांडपाण्याचा निचरा होत नाही. ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहते. तसेच रस्त्याच्या बाजुला लावण्यात आलेल्या हायमस्ट लाईटचे अर्धे लाईट सुरू असून अर्धे बंद असतात. त्यामुळे रस्त्यावर अंधाराच असतो. साकोली येथे रात्री पायी चालणाऱ्यांचे अपघात झाले आहेत.
त्याचप्रकारे दुतर्फा लावण्यात आलेले लोखंडी बॅरीगेट्स अनेक ठिकणाहून चोरून नेण्यात आले आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून याठिकाणी नवीन बॅरीगेट्स लावण्यात आले नाही. रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेले झाडे वाळलेले आहेत. त्याठिकाणी नवीन झाडे लावण्यात आली नाही. त्यामुळे अशोका बिल्डकॉन कंपनीने आधी सर्वसोयी सुविधा पुरवावाव्या नंतरच टोलवसुली करावी, अशी मागणी शहर अध्यक्ष मंदार खेडीकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)