शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
4
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
5
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
6
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
7
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
8
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
9
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
10
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
11
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
12
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
14
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
15
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
16
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
18
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
19
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
20
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे  यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा  कायदा करा,  सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे.

ठळक मुद्देभाकप व किसान सभेचे आयाेजन : तीन काळे शेतकी कायदे रद्द करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : किसान कामगार विरोधी मोदी सरकारने तीन काळे शेतकी  कायदे मंजूर करण्यासाठी अध्यादेश जारी केला होता, त्याला शनिवार रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ, तसेच तीन काळे शेतकी कायदे रद्द करण्याच्या व इतर मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार भंडारा येथे  देशव्यापी चेतावणी दिन  पाळण्यात आला.आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व किसान सभेचे  सचिव माधवराव बांते यांनी केले.शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे  यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा  कायदा करा,  सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे. खमारी बुट्टी (ता. भंडारा) येथील पूर पीडित गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्याने अनेकांची घरे पडली, त्यांना ९५ हजारांचे आर्थिक सहाय्य, अतिक्रमित घरकूलधारकांची घरे नियमानुकूल करून मालकी पट्टे देण्यात यावे. गणेश चिचामे यांना महसूल विभागाच्या चुकीमुळे वन हक्क कायद्याच्या अंतर्गत पट्ट्यापासून वंचित करण्यात आले. त्यांना मालकी पट्टे देण्यात यावे. नंदकिशोर रामटेके व इतर प्रलंबित  जबरान जोतदारांना मालकी पट्टे  देण्यात यावे. महादेव आंबाघरे सुरेवाडा पुनर्वसन यांना  मंजूर भूखंड देण्यात यावे. तसेच ग्रामसेवक कॉलनी भंडारा येथील उर्वरित २७ प्रकल्पग्रस्तांना मोबदला व भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. 

ठाणेदारांना निवेदनविविध मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी ठाणेदारांना निवेदन करण्यात आले. शिष्टमंडळात हिवराज उके, माधवराव बांते सदानंद इलमे, महानंदा गजभिये, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, रत्नाकर मारवाडेे, गणेश चिचामे, विलास केजकर, महादेव ताराचंद आंबाघरे, हरिदास जांगडे, गिरधारी मेश्राम, सुनील बोरकर आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन