‘मापिसा’ कायद्याचा निषेध
By Admin | Updated: August 30, 2016 00:27 IST2016-08-30T00:27:05+5:302016-08-30T00:27:05+5:30
राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित आलेल्या महाराष्ट्र पोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी ...

‘मापिसा’ कायद्याचा निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार : दडपशाहीचा प्रकार होत असल्याचा आरोप
भंडारा : राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित आलेल्या महाराष्ट्र पोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी अॅक्ट अंतर्गत यापुढे लग्न, वाढदिवस, पुजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. शासन दडपशाहीचे धोरण अवलंब करित आहेत. या कायद्याविरोधात भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला.
या आशयाचे पत्रकही राकाँने काढले आहे. नवीन कायद्यामुळे, समारंभासाठी राज्य सरकार नवीन नियमावली आणण्याच्या तयारीत आहे. अशा कार्यक्रमांना जर १०० पेक्षा जास्त पाहुण्यांना ऐकत्रित बोलविण्याचे असेल तर पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने अशा प्रकारच्या कायद्याच्या मसुदा तयार केला आहे. विना परवानगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर ३ वर्ष तुरूंगवास आणि ५० हजार रूपयाची दंडाची तरतुद या मसुद्यात करण्यात आली आहे.
हा कायदा कुणासाठी आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि मग सरकार कोण चालवतय. महाराष्ट्र सरकार की ब्रिटीश सरकार, इंग्रज वेगळे काय करत होते, असे विविध प्रश्नही येथे उपस्थित करण्यात आले आहेत.
परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, प्रदेश महासचिव सुनंदा मुंडले, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, दुध संघाचे संचालक विलास काटेखाये, महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हा अध्यक्ष कल्याणी भुरे, नंदू झंझाड, नितीन तुमाने, किरण अतकरी, अंगराज समरीत, योगेश सिंगनजुडे, देवचंद ठाकरे, लोमेश वैद्य, तोमेश्वर पंचभाई, राजु हेडावू, स्वप्नील नशिने, पंकज ठवकर, अक्षय रामटेके, धनराज साठवणे, डॉ. रविंद्र वानखेडे, बाळु चुन्ने, अरविंद पडोळे, नारायण सिंग राजपुत, सोपान आजबले, किशोर इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)