त्या संस्थापकाचा शिक्षक भारतीकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:08+5:302021-06-28T04:24:08+5:30

संस्थापक व लिपिक केशव निवृत्तीराव भांगे याने महर्षी कणाद हायस्कूल, परळी येथील प्राथमिक शिक्षक सतीश जाधव यांना संस्थापकाच्या पत्नीच्या ...

Protest from Bharati, the teacher of that founder | त्या संस्थापकाचा शिक्षक भारतीकडून निषेध

त्या संस्थापकाचा शिक्षक भारतीकडून निषेध

संस्थापक व लिपिक केशव निवृत्तीराव भांगे याने महर्षी कणाद हायस्कूल, परळी येथील प्राथमिक शिक्षक सतीश जाधव यांना संस्थापकाच्या पत्नीच्या वर्गाची वर्ग हजेरी का लिहिली नाही, या क्षुल्लक कारणावरून अर्वाच्य भाषेत बोलून, जातिवाचक शिवीगाळ केली, तसेच तू माझा गुलाम आहेस, असे बोलून महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकवर्गाचा अपमान केला आहे. त्यामुळे शिक्षक भारती शासनमान्य संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त केला. संबंधित संस्थापकावर कार्यवाही व्हावी, शाळेवर प्रशासक नेमावा, तसेच त्या शिक्षकाच्या जीविताला संबंधित संस्थाचालकाकडून धोका असल्याने संबंधित शिक्षकाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी तक्रारीतून केली आहे. शिष्टमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे, विनोद किंदर्ले, संजय वणवे, नितीन वाघाये, पद्माकर सावरकर, मनोज खोब्रागडे, गोपाल नाकाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Protest from Bharati, the teacher of that founder