'त्या' घटनेच्या निषेधार्थ सिहोरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:09 IST2018-08-28T22:09:00+5:302018-08-28T22:09:15+5:30
बाजार चौक सिहोरा येथील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि नाग मंदिराचे लगत असणाऱ्या पुरातन बाहुली विहिरीत जनावरांच्या मांसाचे तुकडे घालण्यात आले होते. या निषेधार्थ विविध संघटना, गावकरी व सर्व दलीय पक्षाचे वतीने सिहोरा शंभर टक्के व कडकडीत बंद पाळण्यात आला. भर पावसातही गावातून रॅली काढण्यात आली.

'त्या' घटनेच्या निषेधार्थ सिहोरात कडकडीत बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बाजार चौक सिहोरा येथील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि नाग मंदिराचे लगत असणाऱ्या पुरातन बाहुली विहिरीत जनावरांच्या मांसाचे तुकडे घालण्यात आले होते. या निषेधार्थ विविध संघटना, गावकरी व सर्व दलीय पक्षाचे वतीने सिहोरा शंभर टक्के व कडकडीत बंद पाळण्यात आला. भर पावसातही गावातून रॅली काढण्यात आली.
सिहोरा येथील बाजार चौकात दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर व नाग मंदिर आहे. या मंदिराचे शेजारी घराची दाट वस्ती असून देवस्थानचे लगत पुरातन बाहुली विहिर आहे. या बाहुली विहिरीत अज्ञात समाज कंटकांनी जनावरांच्या मांसाचे तुकडे घातले. शनिवारला आठवडी बाजार असल्याने नागरिकांची वर्दळ बाजारात वाढली असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी विहिरीत डोकावून बघितले.
विहिरीतील पाण्यावर जनावरांचे मांसाचे तुकडे तरंगत असल्याचे दिसून येताच गावकरी गोळा झाले. नागरिकांच्या भावना दुखावण्यात आल्याने आरोपीला तात्काळ अटक करण्याची ओरड सुरु झाली. वाढता तणाव लक्षात घेता विहिरीची स्वच्छता करण्यात आली तथा जनावरांचे मांसाचे तुकडे चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. आराध्य दैवत तथा श्रद्धास्थान असणाºया देवस्थानच्या शेजारील विहिरीत असा प्रकार घडला असल्याच्या कारणावरून आरोपीला अटक करण्याची मागणी गावकºयांनी केली.
या घटनेच्या निषेधाथर विविध राजकीय पक्ष, विश्व हिंदू परिषद शाखा, बजरंग दल शाखा आणि गावकºयांचे वतीने आज मंगळवारला सिहोरा बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासून व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, कॉलेज तथा अन्य संस्थांनी कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. अज्ञात समाज कंटकाचे निषेध नोंदविण्यासाठी पावसाची रिपरिप सुरु असताना दुर्गा मंदिरात गावकरी एकत्र आले. पूजा अर्चना करून गावात रॅलीची सुरुवात करण्यात आली. गावाला भ्रमण करीत पुन्हा रॅली मंदिरात पोहचली. मंदिरात आयोजित सभेला जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर, सरपंच मधु अडमाचे, मयुरध्वज गौतम, गजानन निनावे, बजरंग दलचे पंकज शुक्ला, यशवंत हेडावू, गोपाल येळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आरोपीला तात्काळ करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी गावकº यांना अज्ञात आरोपींचे विरोधात भादंवि ४९९ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची शोध मोहीम सुरु असल्याची माहिती दिली आहे. यानंतर गावात शांतता ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. गावात कडकडीत बंद पाळण्यात येत असताना तणावाचे वातावरण व ढवळून निघणार याची याची दक्षता घेत पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवित चोख बंदोबस्त ठेवला आहे.