जंगलाचे रक्षण करणे काळाची गरज

By Admin | Updated: January 4, 2015 23:06 IST2015-01-04T23:06:23+5:302015-01-04T23:06:23+5:30

तालुक्यातील बहुतेक गाव नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील झाडे व वन्यप्राण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनातर्फे विविध

Protecting the Forest The need of the hour | जंगलाचे रक्षण करणे काळाची गरज

जंगलाचे रक्षण करणे काळाची गरज

साकोली : तालुक्यातील बहुतेक गाव नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील झाडे व वन्यप्राण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनातर्फे विविध योजना आहेत. जंगल वाढेल तर या योजनांचा भविष्यात आणुनही लाभ नागरिकांना घेता येईल, असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले.
उमरझरीत व्याघ्रप्रकल्पाच्यावतीने आयोजित धनादेश वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जांभळीच्या सरपंच भीमावती पटले, राजेश खेडीकर, सहाय्यक वनसंरक्षक अशोक खुणे उपस्थित होते. यावेळी उमरझरी, पिटेझरी, कुलबा या गावातील समित्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे धनादेश तर जांभळी खांबा येथील समितीला ४ लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या हस्ते देण्यात आले. संचालन वनक्षेत्राधिकारी संदिप गव्हारे यांनी तर आभारप्रदर्शन दादा राऊत यांनी केले.
काय आहे ग्रामपरिस्थिती?
शासनाने नागझिरा व नवेगावबांध अभयारण्याचे रुपांतर व्याघ्रप्रकल्पात केल्यामुळे येथील वन्यप्राणी व जंगल वाचविणे जिकरीचे झाले आहे. या व्याघ्र प्रकल्पालगत अनेक गावे आहेत. या गावातील बहुतांश लोकांना या जंगलातील काळ्या विकुन उपजीविका करीत आहेत. जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वनविभागाने योजना आखली आहे. या योजनेंतर्गत पर्यावरणातून गोळा होणारा महसूल शासनाला न देता जमा झालेल्या या निधीतून ही समिती गॅस सिलिंडर व गाई-म्हशी खरेदी करेल. गॅस कनेक्शनसाठी लाभार्थी २५ टक्के रक्कम देईल व समिती ७५ टक्के रक्कम देईल तसेच गाय खरेदी करण्यासाठी लाभार्थी ५० टक्के व समिती ५० टक्के रक्कम देईल. यातून त्यांनी आपली उपजिवीका चालवावी व जंगलातील झाडे तोडू नये असा या योजनेचा हेतू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Protecting the Forest The need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.