शहरात राहून जंगलाचे संरक्षण!

By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-07T07:32:03+5:302016-06-07T07:32:03+5:30

कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व बीटात्ील कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरात राहून जंगलाचे संरक्षण करीत आहेत.

Protecting the forest in the city! | शहरात राहून जंगलाचे संरक्षण!

शहरात राहून जंगलाचे संरक्षण!

वनतस्करी वाढली : अधिकारी मुख्यालयी गैरहजर
विलास बन्सोड उसर्रा
कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व बीटात्ील कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरात राहून जंगलाचे संरक्षण करीत आहेत. सन १९८१-८२ मध्ये कांद्री वनपरिक्षेत्राची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात सदर वनपरिक्षेत्र नंदनवन म्हणून प्रसिध्द होता. येथील कर्मचारी स्थायी मुख्यालयी राहत असल्याने त्यावेळी चोऱ्याचे प्रमाण नाहीच्या बरोबर होते. पण आता तसी स्थिती पाहावयास मिळत नाही.
आताचा जंगलाचा रक्षक जंगलाचे संरक्षण करणे ठेवून शहरात राहणे जास्त पसंत करतात. त्यामुळे वनतस्करांना याचा गैरफायदा घेऊन जंगलात असलेले मौल्यवान संपतीचे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
२३ मार्चपासून कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आंबागड किल्ल्याच्या पायथ्याशी सागवान वृक्षाची कत्तल करणारी टोळी सक्रिय झाली असल्याची ‘लोकमत’ मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यावर वनविभागाला जाग आली व त्यांनी इंदल ठाकरे व संपत इनवाते रा.आंबागड यांना पकडण्यात आले. मात्र दयेची भावना ठेवून सदर आरोपीला केवळ आठशे रुपयांचा दंड ठोकून त्यांना सोडण्यात आले.
जंगलात राजरोसपणे अवैध सागवन वृक्षांची कत्तल सुरु असतांना मात्र जंगलातील रक्षक हे शहरात चिरीमिरी करीत होते हे विशेष. असे अनेक प्रश्न आहेत शहरात वास्तव्यास कर्मचारी असल्याने जंगलाकडे त्यांचा लक्ष नाही. शासनाने काही ठिकाणी वनकर्मचाऱ्यांना निवासस्थाने बनवून दिली मात्र त्याचा फायदा कर्मचारी घेत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्याची गरज आहे.

Web Title: Protecting the forest in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.