शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्तावच तीन महिने धूळखात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 02:32 IST

दीड कोटींचे अंदाजपत्रक : जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरीच नव्हती

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात दहा कोवळ्या जीवांचा करुण अंत केवळ प्रशासनाच्या हलगर्जीमुळेच झाल्याचे पुरावे लोकमतच्या हाती लागले आहेत. २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या या रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी दीड कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नसल्याचे लोकमतला आढळले आहे.

‘लोकमत’चा हाती लागलेल्या पत्रानुसार भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांना आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र डॉ. तायडे तसेच डॉ. खंडाते यांनी त्याचा योग्यप्रकारे पाठपुरावा केला नाही. 

‘या’ कार्यालयातून ‘त्या’ कार्यालयात प्रस्ताव १५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावात अग्निशमन यंत्रणा खरेदीसाठी १,५२,४४,७८३ रुपयांची मागणी करण्यात आली होती. संचालक डॉ. तायडे यांनी प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वाक्षरी करून व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक सहमती घेऊन तो आयुक्त कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल असे पत्र, १३ नोव्हेंबर २०२० रोजी आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना पाठविले. या पत्राचा आधार घेऊन डॉ. जयस्वाल यांनी २० नोव्हेंबरला डॉ. खंडाते यांना अंदाजपत्रक त्रुटीची दुरुस्ती करून फेरसादर करण्याचा सूचना केल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयात पोहोचलाच नाही.

 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगFire Brigadeअग्निशमन दल