सरपंचांनी मांडल्या आमसभेत समस्या

By Admin | Updated: March 1, 2015 00:38 IST2015-03-01T00:38:41+5:302015-03-01T00:38:41+5:30

मोहाडी पंचायत समितीत पार पडलेल्या आमसभेत करडी व मुंढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सरपंच, उपसरपंचानी त्यांच्या ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या विविध समस्या व तक्रारी मांडल्या.

Problems in the General Assembly presented by the Sarpanches | सरपंचांनी मांडल्या आमसभेत समस्या

सरपंचांनी मांडल्या आमसभेत समस्या

करडी (पालोरा) : मोहाडी पंचायत समितीत पार पडलेल्या आमसभेत करडी व मुंढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सरपंच, उपसरपंचानी त्यांच्या ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या विविध समस्या व तक्रारी मांडल्या. त्या समस्या सोडविण्याचे आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मोहाडी तालुक्यातील करडी व मुंढरी जि.प. क्षेत्र उपेक्षित राहतो. अधिकाऱ्यांचे या विभागाकडे दुर्लक्ष असते. तालुक्याच्या ठिकाणापासून ४५ कि़मी. चे अंतर असल्याने नेहमी विविध कामांसाठी येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे परिसरातील अनेक ग्रामपंचायतीच्या समस्या, प्रश्न मार्गी लागत नाही. आमसभेत तरी निदान ते मार्गी लागतील या हेतून परिसरातील सरपंच, उपसरपंचांनी भरभरून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या प्रश्न मार्गी लागतील या हेतून परिसरातील सरपंच, उपसरपंचांनी भरभरून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. मार्च २०१३ पासून ग्रामपंचायतीने विज बिलापोटी लाखो रूपयांचा भरणा केला. ग्रामपंचायतींना ५० टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून जिल्हा परिषद कडून दिला जातो. मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटला असताना ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा सानुग्रह अनुदान मिळाला नसल्याचा प्रश्न पालोरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश कुकडे यांनी लावून धरला. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आमदाराने अधिकाऱ्यांना जाब विचारला. ५० टक्क्यापेक्षा जास्त टॅक्स वसुली असणाऱ्या ग्रामपंचायतींना असा अनुदान मिळत असताना का दिले गेले नाही. मात्र पैसाच मिळाला नाही, जेव्हा मिळेल तेव्हा तत्काळ वाटप केले जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबंधाने कळविण्याचे आश्वासन खंड विकास अधिकारी आगलावे यांनी यावेळी दिले.
देव्हाडा येथील रोहयो अंतर्गत झालेल्या पांदण रस्त्याला काही शेतकऱ्यांनी जेसीबी लावून फोडला. अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या. मात्र मार्गदर्शन व कारवाई झाली नाही, असा प्रश्न सरपंच भाऊराव लाळे यांनी मांडला. चौकशी, नुकसानीचे मुल्यांकन करून दंड वसुलीचे निर्देश वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पालोरा येथे कंत्राटी आरोग्य सेविका व तलाठ्याचे पद रिक्त आहे. खडकी, पालोरा, ढिवरवाडा, करडी, मुंढरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. आदी प्रश्न जांभोराचे उपसरपंच ताराचंद समरीत, कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर कुकडे, सरपंच माधुरी उबुके, सरपंच महादेव पचघरे, उपसरपंच शर्मा बोंदरे, सरपंच संगिता वनवे, सरपंच भगवान चांदेवार, सरपंच सिमा साठवणे, सरपंच पुष्पलता ढेंगे, उपसरपंच विजय बांते, उपसरपंच अशोक शेंडे यांनी मांडले. (वार्ताहर)

Web Title: Problems in the General Assembly presented by the Sarpanches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.