शहर विकासाला प्रशासकीय मान्यतेची अडचण
By Admin | Updated: April 22, 2017 00:37 IST2017-04-22T00:37:00+5:302017-04-22T00:37:00+5:30
तब्बल दोन वर्षाच्या प्रशासकीय काळात प्रशासकांनी साकोली येथे २ कोटी ५१ लक्ष ६० हजार २७१ रुपयांची

शहर विकासाला प्रशासकीय मान्यतेची अडचण
२ कोटी ५१ लाखांची कामे प्रस्तावित : अंदाजपत्रकावर १३.३७ लाख खर्च
साकोली : तब्बल दोन वर्षाच्या प्रशासकीय काळात प्रशासकांनी साकोली येथे २ कोटी ५१ लक्ष ६० हजार २७१ रुपयांची कामे प्रस्तावित केली. या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले ; मात्र यातील २९ कामांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने ही कामे रखडलेली आहेत. परिणामी साकोलीच्या विकासात अडचण निर्माण होत आहे. सद्या अस्तित्वात असलेली विद्यमान प्रशासन प्रशासकांच्या काळातील कामांना मंजूरी देणार की नाही हाही महत्वाचा मुद्दा बनला आहे.
साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये झाले. परंतू या नगरपंचायतीवर स्थगिती असल्यामुळे तब्बल दोन वर्ष प्रशासक नेमण्यात आले. प्रशासकांच्या काळात तब्बल २ कोटी ५१ लक्ष ६० हजार २७१ रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यात एकुण ३३ कामांचा समावेश करण्यात आला. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी १३ लक्ष ३७ हजार ९१५ रुपये देय करण्यात आले. यापैकी पाच कामांच्या निविदा काढण्यात आल्या व कामे संबंधित यंत्रणेला देण्यात आली. यातील उर्वरीत २९ कामांची प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने ती कामे तशीच रखडली आहेत. प्रशासकांनी त्याच काळातील कामाची यादी व तयार केलेले अंदाजपत्रक हे कोट्यवधी रुपयांचे असून सदर कामाचे अंदाजपत्रक हे जिल्हाधिकारी कार्यालयात रखडून आहेत. प्रशासकांनी कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात व अंदाजपत्रक तयार करणाऱ्या एजंसीला पैसे देण्याची ऐवढी घाई का केली हा न समजणारा प्रश्न आहे. ज्या प्रमाणात प्रशासकाच्या काळातील अंदाजपत्रके तयार करण्यात आली लाखोचा खर्च करण्यात आला मग त्यांना प्रशासकीय मान्यता का मिळाली नाही,हा प्रश्न आहे.(तालुका प्रतिनिधी)