पशुधनाचा प्रश्न बिकट

By Admin | Updated: July 8, 2014 23:18 IST2014-07-08T23:18:27+5:302014-07-08T23:18:27+5:30

तुमसर तालुक्यात गर्रा बघेडा परिसरातील शेतकरी पावसाअभावी हवालदिल झाला असून आतापर्यंत संपूर्ण शरीर ओले चिंब होईल एवढा पाऊस पडला नाही.

The problem of livestock problems | पशुधनाचा प्रश्न बिकट

पशुधनाचा प्रश्न बिकट

आलेसूर : तुमसर तालुक्यात गर्रा बघेडा परिसरातील शेतकरी पावसाअभावी हवालदिल झाला असून आतापर्यंत संपूर्ण शरीर ओले चिंब होईल एवढा पाऊस पडला नाही.
परिणामी शेतीची मशागत व पेरणी अंतर्गत संपूर्ण पैसा शेतात ओतून बसला. त्यामुळे पावसाने केला घात. बळीराजा पडला संकटात या ब्रिदवाक्याचा पंगतीत अचूकरित्या समाविष्ठ झाला आहे व त्याप्रमाणे स.न. १९-६२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाची पुनरावृत्ती तर होणार नाही, या विवंचनात शेतकरी चिंतातूर झाला आहे. नुकताच जून महिना व जुलै महिन्यातील एक पाव भाग संपूनही वरूण राजाने कृपा दृष्टी न फिरविल्यामुळे परिसरातील कोरडवाहू शेतीची दुबार पेरणीची पैज खात्रीशिर झाली आहे. अलिकडे नुकत्याच बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास येवून कालव्याच्या माध्यमाने शेत लगत असलेल्या भोगवट धारकांच्या जमिनी जवळून दोन्ही भड्या पाणी तुडूंब अवस्थेत वाहत आहे. मात्र लघु पाटबंधारे व जलसंपदा विभागाने या १२ गावातील शेकऱ्यांना कालव्यात मायनर न दिल्यामुळे सागरात असून कंठ कोरडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: The problem of livestock problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.