संस्काराचे मोती-२०१६ चे बक्षीस वितरण
By Admin | Updated: March 12, 2017 00:45 IST2017-03-12T00:45:27+5:302017-03-12T00:45:27+5:30
लोकमतच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी २०१६ मध्ये राबविण्यात आलेली संस्काराचे मोती स्पर्धेच्या लकी ड्रॉ चे बक्षिस वितरण करण्यात आले.

संस्काराचे मोती-२०१६ चे बक्षीस वितरण
लकी ड्रॉचे विजेते : टॅब व सायकलचे वाटप
भंडारा : लोकमतच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी २०१६ मध्ये राबविण्यात आलेली संस्काराचे मोती स्पर्धेच्या लकी ड्रॉ चे बक्षिस वितरण करण्यात आले. तीनही विजेत्यांना अनुक्रमे सायकल व टॅब भेट स्वरुपात देण्यात आली.
संस्काराचे मोती २०१६ च्या लकी ड्रॉ चे बक्षिस वितरण करण्यात आले. सायकल विजेत्या स्पर्धकांमध्ये वैनगंगा विद्यालय पवनीची इयत्ता सहावा (क) ची विद्यार्थिनी चेतना प्रकाश तुलसकर व तुमसर येथील शारदा विद्यालयाची इयत्ता आठवा (अ) ची विद्यार्थिनी तुषाली बलराज भगत तर टॅब चा विजेता ठरला भंडारा येथील संत शिवराम उच्च माध्यमिक शाळा इयत्ता पाचवा (अ) चा विद्यार्थी प्रांजल भाऊराव ढोमणे. या सर्व विजेत्यांना एका कार्यक्रमात हे बक्षिस वितरण करण्यात आले.
बक्षिस वितरण प्रसंगी भंडारा लोकमत जिल्हा कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक मोहन धवड, जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, वितरण अधिकारी विजय बन्सोड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, जाहिरात प्रतिनिधी कंकर अटराये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे मोती ही स्पर्धा घेण्यात येते. यात शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे संस्काराचे मोती हे एक व्यासपीठ ठरले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, कुपन चिकटवा स्पर्धा घेण्यात येते. यातील विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येते. यातीलच निवडक विद्यार्थ्यांची लकी ड्रॉ योजनेतून विमान सफारीसाठी निवडही केली जाते. (शहर प्रतिनिधी)