खासगी माध्यमिक शिक्षकांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 20, 2014 23:08 IST2014-10-20T23:08:09+5:302014-10-20T23:08:09+5:30
आॅक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजेच २० तारखेपर्यंत आॅक्टोबरचे वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता.

खासगी माध्यमिक शिक्षकांची दिवाळी अंधारात
सानगडी : आॅक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजेच २० तारखेपर्यंत आॅक्टोबरचे वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने कार्यवाहीसुद्धा करण्यात आली. परंतु अचानक अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे वेतन जुन्या पद्धतीने व अन्य शिक्षकांचे वेतन आॅनलाईन पाठ विण्याबाबद १४ आॅक्टोबरला शासनाने आदेश काढले. परंतु ७ तारखेपुर्वीच प्रत्येक शाळेने शिक्षकांचे बिल अतिरिक्त झाले. त्या कर्मचाऱ्यासह वेतन पथकाला पाठविले. बिल पारित सुद्धा झाले होते. परंतु १४ आॅक्टोबरचा आदेश धडकताच वेतन पथकाने जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळेचे वेतन बिल परत करण्यास सुरूवात केली. जर हा शासनाचा आदेश ३० सप्टेंबरपर्यंत निघाला असता तर कार्यवाही करणे सोयीस्कर झाले असते. अवघ्या चार दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. चार दिवसात कार्यवाही करून अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन बिल जुन्या पद्धतीने व इतर कर्मचाऱ्याचे वेतन बिल आॅनलाईन पद्धतीने पाठविणे शक्य नसल्याने खाजगी माध्यमिक शिक्षकांची व अन्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार हे नक्की.
ही माहिती शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच डॉ. उल्हास फडके, अशोक तेलपांडे, अशोक वैद्य, जिल्हा सचिव अंगेश बेलपांडे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व वित्त अधिकाऱ्यांशी आॅक्टोबरला वेतन देण्याबाबद व शासनाने काढलेला आदेश नोव्हेंबर पासून लागू करण्याबाबद चर्चा करण्यात आली. सदर शिष्ठमंडळात परिषदेणे तालुका अध्यक्ष पुरूषोत्तम डोमळे, कार्यवाह अमोल हलमारे, जयंत झोडे, कांचन गहाणे, महादेव सोनवाने, बोपचे, बोडखे यासह प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)