हल्ल्याच्या निषेधार्थ खासगी दवाखाने बंद
By Admin | Updated: March 24, 2017 00:30 IST2017-03-24T00:30:43+5:302017-03-24T00:30:43+5:30
राज्यातील डॉक्टरांवर होत असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पवनी मेडीकल असोसिएशन तर्फे आज शहरातील सर्व डॉक्टरांनी आपले

हल्ल्याच्या निषेधार्थ खासगी दवाखाने बंद
पवनी : राज्यातील डॉक्टरांवर होत असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पवनी मेडीकल असोसिएशन तर्फे आज शहरातील सर्व डॉक्टरांनी आपले खासगी दवाखाने बंद ठेवून निवेदन पवनी पोलीस स्टेशनला देण्यात आले.
राज्यात पुणे, मुंबई, धुळे, औरंगाबाद आदी ठिकाणच्या रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनांचा येथील पवनी मेडीकल असोसिएशनतर्फे निषेध करण्यात आला.
याकरिता असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी आपले सर्व खासगी दवाखाने बंद ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात हल्लेखोरांवर महाराष्ट्र मेडीकल प्रोटेक्शन अॅक्टनुसार कारवाई करून शासनाने सर्व डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
आज अत्यावश्यक रुग्णसेवा वगळता सर्व खासगी दवाखाने बंद होते.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ.प्रकाश देशकर, डॉ.अरविंद गभणे, डॉ.विक्रम राखडे, डॉ.राजेश नंदूरकर, डॉ.निशांत मोहरकर, डॉ.विजय ठवकर, डॉ.श्रीकांत चांदेवार, डॉ.गंगाधर सावरबांधे, डॉ.सुभाष तेलमासरे, डॉ.आशिष मोहरकर, डॉ.राजेश मुंडले, डॉ.अंशुल गभणे, डॉ.सुनिल गभणे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
भंडाऱ्यातील खासगी दवाखाने बंद
भंडारा : शहरातील सर्वच खासगी दवाखाने गुरुवारी बंद असल्याने रुग्णांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी सायंकाळच्या सुमारास शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व सेवा सुरळीत असली तरी प्रसूती विभाग वगळता कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली नाही. या दरम्यान डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दवाखाने बंद ठेवून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात आयएमएचे अध्यक्ष डॉ.सीमा कावरे, सचिव दिपाली गिऱ्हेपुंजे, डॉ.अरुण कुंभारे, डॉ.गवळी, डॉ.प्रदीप मेघरे, डॉ.गोपाल व्यास, डॉ.मनोज झंवर, डॉ.शेखर नाईक, डॉ.संजय वाणे, डॉ.अरुण नडंगे यांच्यासह अन्य डॉक्टर्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)