कैद्यांची मानसिकता बदलाचा ‘योग’

By Admin | Updated: December 12, 2015 00:38 IST2015-12-12T00:38:18+5:302015-12-12T00:38:18+5:30

एखाद्या गुन्ह्यात नकळंत अडकलेल्या कैद्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.

Prisoner's mentality changes 'yoga' | कैद्यांची मानसिकता बदलाचा ‘योग’

कैद्यांची मानसिकता बदलाचा ‘योग’

जिल्हा कारागृहात योग प्राणायाम : २०० जणांनी घेतला लाभ
भंडारा : एखाद्या गुन्ह्यात नकळंत अडकलेल्या कैद्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. यामुळे अनेकदा निरपराध कैदी मोठ्या गुन्हेगारीकडे वळतो. अशा कैद्यांची मानसिकता बदलविण्याची नितांत गरज असते. हे हेरून भंडारा येथील योग प्राणायाम शिक्षकांनी जिल्हा कारागृहातील कैद्यांना योगाचे धडे देऊन त्यांना मानसिक समाधान दिले.
छोट्या-मोठ्या गुन्ह्यातील अनेक आरोपी जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. किंवा अनेकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. यात अनेकजण कदाचित निरपराधही असू शकतात. मात्र, ही न्यायालयीन बाब आहे. जिल्हा कारागृहातील असलेला कैदी हा वेगळ्या मानसिकतेतून जात असतो. त्यांची मानसिकता ढासळू नये, यासाठी व त्यांना समाजात पुन्हा तीच वागणूक मिळेल. या अपेक्षेसहक भंडारा येथील पंतजली योग समिती (मिस्कीन टँक) योग उद्यान व योग भारती बहुउद्देशीय संस्था भंडारा यांच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून कारागृहातील कैद्यांना योग प्राणायामचे धडे गिरविण्यात येत आहे. योगातून कैद्यांची बनलेली मानसिकता बदलविण्याचा मोठा योग यातून करण्याचा प्रयत्न योग शिक्षकांनी केला आहे. कैद्यांना योग शिक्षक शाम कुकडे, शालीकराम झंझाड व यशवंत गायधनी यांनी रोज सकाळी एक तास योग धडे दिले. यांनी कैद्यांनी योगासन, प्राणायाम, अष्टांग योग साधना, सुर्यनमस्कार, ध्यान, धारना व आयुर्वेद औषधोपचाराची सात दिवसीय शिबिरातून मार्गदर्शन केले. मागील दहा वर्षापासून हे शिक्षक कारागृहात योग धडे गिरवित असून अनेकांना आता ते नित्यनेमाने करण्याची सवय जडली आहे. कळत नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे मनावर विपरीत परिणाम पडलेले कैदी यातून बाहेर पडले आहेत. नियमित योग प्रात्यक्षिक करीत असल्याने त्यांना अपराधीक जीवनाच्या कचाट्यात सापडल्याच्या मानसिकतेतून बाहेर आल्याचा प्रत्यय आल्याचे काही कैद्यांनी यावेळी सांगितले.
सात दिवस चाललेल्या योग प्राणायाम शिबिराला कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे, कारागृह कर्मचारी मानिक काळे, धनश्याम रहांगडाले, लाला मोटघरे, अरविंद मेश्राम, अनिल खंडाळे, हेमराज शेंडे, भुपेश राजीले, अमित कोठारकर, कविता मरगदे, ललीता पाटील आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Prisoner's mentality changes 'yoga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.