शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेला 23 जुलैची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, आदी बाबींकरिता नुकसानभरपाई देय आहे. योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची मुदतवाढ २३ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देहिंदुराव चव्हाण : खरीप हंगाम पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) सन २०२१-२२ राबविण्यास शासनाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे. भंडारा जिल्ह्याकरिता या योजनेअंतर्गत भात व सोयाबीन ही दोन अधिसूचित पिके आहेत. नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरण्यात येईल. सध्याची परिस्थिती पावसाची अनियमितता लक्षात घेता पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, आदी बाबींकरिता नुकसानभरपाई देय आहे. योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची मुदतवाढ २३ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) सन २०२१-२२  अंतर्गत धान व सोयाबीन दोन्ही पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत आहे. भंडारा जिल्ह्याकरिता एचडीएफसी इर्गो इन्सुरंस क. लि. मुंबई ही इन्सुरंस कंपनी निश्चित झालेली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत धान पीक (खरीप हंगाम) करिता शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्त्याची रक्कम रुपये ७६० प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये ३८,००० हजार रुपये प्रति हेक्टर आहे. तसेच सोयाबीन पीक (खरीप हंगाम)करिता विमा हप्त्याची रक्कम रुपये ५५०  प्रति हेक्टर असून, विमा संरक्षित रक्कम रुपये २७,५०० प्रति हेक्टर आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्र, पिके, विमा हप्ता व योजनेच्या इतर तपशिलाकरिता क्रॉप इंशुरन्स हे मोबाईल ॲप शेतकऱ्यांकरिता मराठी भाषेमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून योजनेबाबत माहिती वेळोवळी शेतकऱ्यांना  पाहता येणार आहे. यासोबतच प्रत्येक तालुक्यात कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षांमार्फत मागर्दर्शन केले जात आहे.

पावसाच्या दडीमुळे पीक विम्याकडे वाढला कल  - जुलै महिना संपत आला तरी अद्यापही जोरदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने जिल्ह्यात धान राेवणीची कामे रखडली आहेत. अवर्षणाची स्थिती असल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत ८० हजारांच्या आसपास शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेकडे कल वाढला असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. पिकांची पेरणी न झाल्याने होणारे नुकसान, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूरक्षेत्र, जलमय होणे, भूस्खलन, आदी बाबींमध्ये उत्पादनात येणारी घट पीक विम्यासाठी ग्राह्य धरण्यात येते, अशा वेळी बळीराजाला पीकविम्याचा आधार मिळतो.

गतवर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सन २०२१- २२ मध्ये प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत सहभाग होण्यासाठी शासनाने २३ जुलै २०२१ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन खरीप पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. -हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा