गत दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांना निवड श्रेणी वरिष्ट श्रेणी देणे, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरणे मंजुर करणे २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची वेतनातून डीसीपीएस योजनांतर्गत १० टक्के रक्कम वसूल करण्यात आलेली आहे व त्यांना भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्रदान करूनही रक्कम त्यांच्या खात्यात आजपर्यंत जमा करण्यात आलेली नाही. डीसीपीएस शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाची रक्कम जुलैपूर्वी रोखीने देण्यात यावी, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत सर्व रिक्त पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावी, या संबंधाने वारंवार मागणी करूनही विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांचे रिक्त पदामुळे शिक्षणाच्या प्रसार प्रचार कार्यात जिल्ह्यात अडचण निर्माण होत आहे. जिल्हा परीषद प्रशासनाशी अनेकदा चर्चा, निवेदने देऊनही समस्या सुटत नसल्याने २ जुलै रोजी आंदोलनाचा निर्धार केला आहे. आंदोलनाला शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय बावनकार, दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, मुकेश मेश्राम, संचालक शंकर नखाते, संचालक नामदेव गभने, संचालक प्रकाश चाचेरे, तुलसी हटवार, कैलास बुद्धे, चेतन बोरकर आदींनी केली आहे.
प्राथमिक शिक्षकांचे २ जुलैला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST