प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार
By Admin | Updated: September 30, 2014 23:33 IST2014-09-30T23:33:31+5:302014-09-30T23:33:31+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी शिक्षणाधिकारी प्राथ. एस.बी. घोडेस्वार यांचेशी जि.प. भंडारा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार
भंडारा : मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी शिक्षणाधिकारी प्राथ. एस.बी. घोडेस्वार यांचेशी जि.प. भंडारा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांचे नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या प्रासंगिक समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन जि.प. च्या अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यामध्ये माहे आॅगस्ट, सप्टेंबर २०१४ चे नियमित वेतन थकबाकीसह देण्यात येणार असून माहे आॅक्टोबर २०१४ चे वेतन अग्रीमसह दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे २००६ पासून शिक्षकांचे स्थानांतरण भत्त्यासाठी लागणारी तरतूद शासनाकडून मागणी करणार आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल ते जुलै २०१४ चे थकीत वेतन त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे आचारसंहिता संपल्याबरोबर शासन निर्णयाप्रमाणे भरण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सर्व प्राथमिक शिक्षकांना सेवेत कायम करण्याचे आदेश तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना नियमित करण्याचे आदेश चटोपाध्याय, निवड श्रेणी आणि तफावत प्रकरणे, प्रसूती रजा, वैद्यकीय परिपूर्ती देयके, सन २०१३-१४ पर्यंत जमा झालेली जीपीएफची पावती सेवानिवृत्त शिक्षकांचे गटविमा प्रकरणे आणि अतिरिक्त शिक्षकांचे कार्यशाळेमध्ये अन्याय झालेल्या जे.एम. पटोले यांच्या प्रस्तावासंबंधी चर्चा होऊन त्वरित सोडविण्याचे लेखी आश्वासन संबंधित विभाग प्रमुखांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच डाटा एन्ट्री आॅपरेटरचे शालार्थ वेतनही काढणार आहे. या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे राज्य पदाधिकारी नरेश कोल्हे, यादव वाडीभस्मे, देवराम थोटे, मुलचंद वाघाये, शीलकुमार वैद्य, नेपाल तुरकर, रामेश्वर कांबळे, रमेश काटेखाये, शिवणकर, अशोक ठाकरे, गुलाब आंबोणे, युवराज वणवे, केशव बुरडे, प्रतिभा टेंभेकर, आदेश बोंबार्डे, बांते, संजय आजबले, संजय भांडारकर, अशोक चरडे, विजय चाचेरे, झिंगरे, महेश चोले, यशवंत ढबाले, दिलीप ब्राह्मणकर, शंकर नखाते, केशव अतकरी, नरेश देशमुख, टीकाराम शेंडे, योगेश कुटे, तुलशीदास पटले, यशवंत बिऱ्हे, यशपाल बगमारे, रवि नखाते, रमेश फटे, ठवकर, मुकेश मेश्राम, अशोक भुरे, विलास चौधरी, दिवाकर पांगूळ, श्रीराम जांभूळकर, वनवास धनिस्कर, योगेश पुडके, अरुण बघेले, दमाहे, रवींद्र वंजारी, हिवराज लंजे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)