प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांनी 'हाऊसफुल्ल'
By Admin | Updated: September 20, 2014 23:45 IST2014-09-20T23:45:57+5:302014-09-20T23:45:57+5:30
यावर्षीचा डेंग्यूचा पहिला बळी पालोरा येथे गेला. संपूर्ण परिसरात डेंग्यूचा उद्रेक झाला. डेंग्यूची शंका खासगी दवाखान्याने दार ठोठावून रुग्ण खर्च करीत आहे. डॉक्टरही नागरिकांच्या धास्तीचा

प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांनी 'हाऊसफुल्ल'
करडी (पालोरा) : यावर्षीचा डेंग्यूचा पहिला बळी पालोरा येथे गेला. संपूर्ण परिसरात डेंग्यूचा उद्रेक झाला. डेंग्यूची शंका खासगी दवाखान्याने दार ठोठावून रुग्ण खर्च करीत आहे. डॉक्टरही नागरिकांच्या धास्तीचा फायदा उचलताना दिसून येत आहे. करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजच रुग्णांची प्रचंड गर्दी असते. रुग्णांनी केंद्र हाऊसफुल झाल्याचे दिसून येते. हिच परिस्थिती संपूर्ण मोहाडी तालुक्यातही आहे.
जिल्हा आरोग्य विभागाचे वतीने डेंग्यूच्या आजाराने एकच रुग्ण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. जाीणवपूर्वक खरी आकडेवारी लपविली जात असून प्रमाण मोठे आहे. डेंग्यूच्या आजाराशिवाय अज्ञात आजाराने सुद्धा डोके वर काढले आहेत. थंडी लागून ताप, खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर व छातीवर सुजन आदी व अन्य आजारांच्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. वातावरणाच्या बदलाचा परिणाम म्हणून या आजारांकडे बघितले जाते. बदलत्या वातावरणामुळे बालकांची रोग प्रतिकार क्षमता कमी असल्याने सर्वाधिक बाल रुग्ण रुग्णालयात दिसून येतात. मोहाडी तालुक्यात ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांत बालकांचे प्रमाण अधिक आहे. त्याचा अनपेक्षित फटका शाळांमधील मुलांच्या उपस्थितीवर झाला आहे. नागरिकांनी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे, पाण्याचे टाके स्वच्छ करून एक दिवस कोरडे ठेवावे, घराशेजारील पाण्याचे डबके तसेच स्रानगृहाच्या खड्ड्यात ब्लिचिंग पावडर किंवा तेलाची फवारणी करावी. नाल्यामध्ये कचरा न घालता खड्ड्यांमध्ये कचरा घालावा. (वार्ताहर)