बाल महोत्सवाची प्राथमिक फेरी उद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 00:51 IST2016-01-23T00:51:31+5:302016-01-23T00:51:31+5:30
लोकमत बाल विकास मंचतर्फे २४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील राजीव गांधी चौकातील भंडारा पॅरामेडीकल कॉलेजच्या सांस्कृतिक सभागृहात...

बाल महोत्सवाची प्राथमिक फेरी उद्या
प्रवेश नि:शुल्क : एकल नृत्य, ड्रामेबाज, टॅलेन्ट हंट, बेस्ट अँकर स्पर्धा
भंडारा : लोकमत बाल विकास मंचतर्फे २४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील राजीव गांधी चौकातील भंडारा पॅरामेडीकल कॉलेजच्या सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय आंतरशालेय बालमहोत्सवाच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नि:शुल्क शाळा व सदस्य नि:शुल्क सहभागी होऊ शकतील. विजयी स्पर्धकांना जिल्हास्तरीय बाल महोत्स्वात सरळ प्रवेश देण्यात येईल.
महोत्सवात वर्षे ५ ते १५ वयोगटातून एकल नृत्य, एकपात्री अभिनव (बेस्ट ड्रामेबाज), एकापेक्षा एक (टॅलेन्ट हन्ट) व उत्कृष्ट निवेदक (बेस्ट एन्कर) स्पर्धेकरिता प्राथमिक निवळ फेरी घेण्यात येईल. जिल्ह्यातील निवडक शाळेतून दिलेल्या प्रवेशपत्रातून स्पर्धकांची यादी प्राप्त होत आहे. समुह नृत्य संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेत सरळ प्रवेश राहील. इच्छूक स्पर्धकांनी शाळेतील मुख्याध्यापक किंवा नोंदणी प्रमुखाला संपर्क साधावे.
प्राथमिक फेरीकरिता नृत्यगीत पेनड्राईव्ह मध्ये आणणे आवश्यक आहे. सदस्य नोंदणी कार्ड शिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे ९०९६०१७६७७, ९४२१०७१००१ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)