मिशन स्कॉलरशिपअंतर्गत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:28+5:302021-07-15T04:24:28+5:30
तुमसर : मिशन स्कॉलरशिपअंतर्गत स्कॉलरशिप परीक्षा सत्र २०१९ - २०मध्ये इयत्ता ५वी व ८वी तसेच नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण व ...

मिशन स्कॉलरशिपअंतर्गत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव
तुमसर : मिशन स्कॉलरशिपअंतर्गत स्कॉलरशिप परीक्षा सत्र २०१९ - २०मध्ये इयत्ता ५वी व ८वी तसेच नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण व निवड झालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार सभारंभ विवेकानंद सभागृह पंचायत समिती, तुमसर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित धीरज पाटील, खंडविकास अधिकारी पंचायत समिती, तुमसर तसेच अतुल वर्मा सहाय्यक खंडविकास अधिकारी पंचायत समिती, तुमसर विजय आदमने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, तुमसर तसेच टी. ए. कटनकार अधीक्षक (शापोआ) व सुभाष मुकुर्णे केंद्रप्रमुख उपस्थित होते. सत्कार समारंभामध्ये उत्तीर्ण व निवड झालेल्या विदयार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मिशन स्कॉलरशिप वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विदयार्थी, शिक्षक व पालकांचे मनोगत घेण्यात आले. अध्यक्षीय भाषणामध्ये धीरज पाटील खंडविकास अधिकारी पंचायत समिती, तुमसर यांनी विदयार्थ्यांना बालपणातील छंद जोपासून अभ्यासूवृत्ती वाढवावी, याकडे लक्ष केंद्रीत केले. अतुल वर्मा सहाय्यक खंडविकास अधिकारी पंचायत समिती, तुमसर यांनी पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनामधून विद्यार्थी घडतात, असे सांगितले. तसेच विजय आदमने गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करावेत, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधनव्यक्ती उज्ज्वला बाबनकर यांनी केले. साधनव्यक्ती संगीता भवसागर यांनी आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्व साधनव्यक्ती व कर्मचारी यांनी सहकार्य केले.